३२ वर्षीय पीएसआयचं निधन.....

अचानक पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल झालेले पोलीस उपनिरीक्षक नितेश सूर्यभान देशमुख यांचे निधन झाले.

३२ वर्षीय पीएसआयचं निधन.....

अचानक पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल,३२ वर्षीय पीएसआयचं निधन.....

मुंबई : लातूर जिल्ह्यातील बाबूळगावचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक नितेश देशमुख ,हे मुंबईतील बांगुर नगर पोलीस ठाण्यात कर्तव्याला होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने नितेश देशमुख यांनी पत्नी आणि दीड वर्षीय मुलीला मूळगावी सोडलं होतं. दरम्यान, कोरोना संकट काळात कर्तव्य बजावत असताना नितेश देशमुख यांना अचानक पोटदुखीचा त्रास सुरु झाला. त्यामुळे १२ जुलै रोजी ते कांदिवली परिसरातील खाजगी नम: रुग्णालयात दाखल झाले.

उपचार सुरु असताना बुधवारी मध्यरात्री त्यांची प्रकृती अचानक खालवली आणि पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल झालेले पोलीस उपनिरीक्षक नितेश सूर्यभान देशमुख यांचे दिनांक १४ /०७ /२०२० रोजी  पहाटे १.५२ वाजताच्या सुमारास निधन झाले. ते ३२वर्षांचे होते.नितेश देशमुख यांच्या मृत्यूची बातमी समजताच बांगुर पोलीस ठाण्यातील सहकाऱ्यांसह त्यांच्या बॅचमधील मित्रमंडळी हादरले. अतिशय गुणवान व्यक्तीमत्व असलेले नितेश देशमुख यांचे अचानक जाणे सर्वांसाठी धक्कादायक ठरलं आहे.
मृत्यूपूर्वी त्यांची कोव्हिड-१९ चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावरच नितेश देशमुख यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.