फोर्टमधील १०० वर्ष जुनी भानुशाली इमारत दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू...

मुंबईतील फोर्ट परिसरात भानुशाली या रहिवाशी इमारतीचा भाग कोसळून  दुर्घटना घडली. इमारतीचा 40 टक्के भाग काल गुरुवार 16 जुलै संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास कोसळला.

फोर्टमधील १०० वर्ष जुनी भानुशाली इमारत दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू...

फोर्टमधील १०० वर्ष जुनी भानुशाली इमारत दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू....

मुंबई : मुंबईतील फोर्ट परिसरात भानुशाली या रहिवाशी इमारतीचा भाग कोसळून  दुर्घटना घडली. धोकादायक असलेल्या या इमारतीचा 40 टक्के भाग काल गुरुवार 16 जुलै संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास कोसळला. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 23 जणांना बाहेर काढण्यात आले असून आणखी काही जण अडकल्याची भीती आहे. आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

या दुर्घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथकं तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.