ही माहिती शेअर करताना करा विचार, अन्यथा अकाऊंटमध्ये पैसे होतील गायब

सर्व ग्राहकांनी त्यांची वैयक्तिक माहिती त्यांच्यापर्यंतच ठेवावी. तसेच कोणताही बँकिंग फ्रॉड झाल्यास सायबर पोलिसांना तातडीने कळवा, असे ट्वीट SBI ने केले आहे.

ही माहिती शेअर करताना करा विचार, अन्यथा अकाऊंटमध्ये पैसे होतील गायब
money will disappear

ही माहिती शेअर करताना करा विचार, अन्यथा अकाऊंटमध्ये पैसे होतील गायब

money  will disappear

 सर्व ग्राहकांनी त्यांची वैयक्तिक माहिती त्यांच्यापर्यंतच ठेवावी. तसेच कोणताही बँकिंग फ्रॉड झाल्यास सायबर पोलिसांना तातडीने कळवा, असे ट्वीट SBI ने केले आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया  ने 44 कोटींहून अधिक ग्राहकांना सावध केलं आहे. SBI ने ग्राहकांनी तुमचा वैयक्तिक तपशील कोणासोबतही शेअर करु नका, असा सल्ला दिला आहे. सर्व ग्राहकांनी त्यांची वैयक्तिक माहिती त्यांच्यापर्यंतच ठेवावी. तसेच कोणताही बँकिंग फ्रॉड झाल्यास सायबर पोलिसांना तातडीने कळवा, असे ट्वीट SBI ने केले आहे. याबाबत त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देण्यात आली आहे.

देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर डिजीटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. त्यासोबतच ऑनलाईन फसवणूक होण्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर SBI ने आपल्या ग्राहकांना ऑनलाईन फ्रॉड होण्यापासून वाचवण्यासाठी सतर्क केले आहे. SBI ने केलेल्या ट्वीटनुसार, सर्व ग्राहकांनी त्यांची वैयक्तिक माहिती ही त्यांच्याकडे ठेवा. इतर कोणालाही ही माहिती देताना विचार करा. यामुळे तुमच्या खात्यातील पैसे सुरक्षित राहतील, अशी माहिती SBI ने दिली आहे.

एसबीआयने केलेल्या ट्वीटनुसार, Mr. Thinkeshwar हे त्यांची खासगी माहिती नेहमी गुप्त ठेवतात. कोणतीही खासगी माहिती इतरांना देतेवेळी ते दोनदा विचार करतात. तसेच जर अशाप्रकारची कोणतीही घटना घडल्यास कृपया https://cybercrime.gov.in वर तक्रार करा.

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी कोणालाही पॅन कार्ड (PAN Card) माहिती, आयएनबी प्रमाणपत्रे, मोबाइल नंबर, यूपीआय पिन, एटीएम कार्ड क्रमांक, एटीएम पिन आणि यूपीआय व्हीपीए सांगू चुकूनही सांगू नका. जर तुम्ही कोणतीही खासगी माहिती एखाद्याबरोबर शेअर केली तर तुमचे अकाऊंट खाली होऊ शकते.

दरम्यान सद्यस्थितीत कर्जाच्या नावाखाली बँकेत फ्रॉड केले जात आहे. जर तुम्हाला SBI Loan Finance Ltd या नावे कोणताही फोन आला तर काळजी घ्या. हा फोन बनावट असू शकतो. याचा SBI शी काहीही संबंध नाही.

अशा फेक कॉल द्वारे ते बनावट कर्जाच्या ऑफर देत आहेत, असेही SBI ने सांगितले आहे.