धूम स्टाईलने  मोबाईल चोरणारे चोरटे गजाआड...| मौज मजा आणि मैत्रिणींच्या हौस पुरवण्यासाठी करायचे चोरी...

कल्याण डोंबिवलीत  रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तींच्या हातातून धूम स्टाईलने मोबाईल हिसकावून पळ काढल्याचा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या .

धूम स्टाईलने  मोबाईल चोरणारे चोरटे गजाआड...| मौज मजा आणि मैत्रिणींच्या हौस पुरवण्यासाठी करायचे चोरी...
Dhoom style mobile thieves ...
धूम स्टाईलने  मोबाईल चोरणारे चोरटे गजाआड...| मौज मजा आणि मैत्रिणींच्या हौस पुरवण्यासाठी करायचे चोरी...
धूम स्टाईलने  मोबाईल चोरणारे चोरटे गजाआड...| मौज मजा आणि मैत्रिणींच्या हौस पुरवण्यासाठी करायचे चोरी...

धूम स्टाईलने  मोबाईल चोरणारे चोरटे गजाआड...

मौज मजा आणि मैत्रिणींच्या हौस पुरवण्यासाठी करायचे चोरी...

 कल्याण : कल्याण डोंबिवलीत रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तींच्या हातातून धूम स्टाईलने मोबाईल हिसकावून पळ काढल्याचा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या.नवनाथ निकम नामक 22 वर्षीय तरुण हा रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या 2 तरुणांनी त्याच्या हातातील मोबाईल जबरदस्ती हिसकावून पळ काढला.

यावेळीघडलेला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला.नवनाथ याने कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असता पोलिसांनी तपास सुरू केला.तपासा दरम्यान पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही लागला आणि सीसीटीव्ही च्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.या प्रकरणी  पोलिसांना तीन जणांना अटक करण्यात यश आले आहे. निखिल ठाकरे, अविनाश चिकणे, मूनवर शेख अशे या तीन आरोपींची नावे असून या मोबाईल चोरट्याने या आधीही आशा प्रकारे चोरी केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी 13 मोबाईल जप्त केले आहेत.आशा प्रकारे अजून किती गुन्हे केले आहेत.आणि या चोरट्यांनी आणखी इतर ठिकाणी अश्या प्रकारे चोरी केली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.निव्वळ मौज मजा आणि मैत्रिणींच्या हौस पुरवण्यासाठी निखिल ठाकरे हा मोबाईल चोरी करून विकत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कल्याण, ठाणे

 प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________