आमदार सुनिल भुसारा शेतकऱ्यांच्या बांधावर...| वाडा तालुक्यातील भातपीक नुकसानीची केली पाहणी...
विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा यांनी आज दि. २३ ऑक्टोबर रोजी आपल्या मतदारसंघातील वाडा तालुका क्षेत्रात परतीच्या पावसाने भातशेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी वाडा तहसिलदार उद्धव कदम व तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन केली व नुकसानीचे पंचनामे योग्य प्रकारे करण्याच्या सुचना दिल्या.

आमदार सुनिल भुसारा शेतकऱ्यांच्या बांधावर
वाडा तालुक्यातील भातपीक नुकसानीची केली पाहणी...
वाडा/जयेश घोडविंदे : विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा यांनी आज दि. २३ ऑक्टोबर रोजी आपल्या मतदारसंघातील वाडा तालुका क्षेत्रात परतीच्या पावसाने भातशेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी वाडा तहसिलदार उद्धव कदम व तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन केली व नुकसानीचे पंचनामे योग्य प्रकारे करण्याच्या सुचना दिल्या.
विविध गावांत पाहणी करुन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर आमदार भुसारा यांनी शेतकऱ्यांना नुकसान भपाईचे ठोस आश्वासन दिले. यावेळी चर्चा करतांना त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे हे अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री असून त्यांच्या नेतृत्वाखाली शासनाने पहिल्या टप्प्यात १० हजार कोटींची मदत जाहीर केली असल्याचे व आवश्यकतेप्रमाणे मदत जाहीर केली जाईल असे सांगितले. तसेच मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.
दौऱ्यामध्ये घोडमाळ येथील शेतीची पहाणी करत असतांना तेथील शेतकऱ्यांनी मांडलेल्या विजेचा व पिण्याच्या पाणी प्रश्नावरही त्यांनी ठोस आश्वासन दिले. याबरोबरच आंबिस्ते खुर्द गावातील विज पडून मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांची भेट घेवून त्यांना आर्थिक मदत केली. तर बोरांडे येथील विष्णू पाटील यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने त्यांच्या कुटूंबियांचीही सांत्वनपर भेट घेऊन दौऱ्याचा समारोप केला.
या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पालघर जिल्हा सरचिटणीस अशोक गव्हाळे, सुरेश पवार, तालुकाध्यक्ष रोहिदास पाटील, जव्हार तालुकाध्यक्ष कमळाकर धुम, वाडा शहराध्यक्ष अमिन सेंदू, जि.प.सदस्य शशिकांत पाटील, सौ. अक्षता चौधरी, युवानेते विराज पाटील, राजेश चौधरी, सचिन अधिकारी, हेमंत पाटील, अजित चौधरी, कल्पेश पाटील, कुमार पाटील, प्रकाश पाटील, समीर भानुशाली, मिलिंद सावंत, राजेश सावंत व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाडा
प्रतिनिधी -जयेश घोडविंदे
__________