मिरज रेल्वे जंक्शन चे साहित्यरत्न डॉ.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रेल्वे जंक्शन असे नामकरण करण्यात आले...
साहितरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांचे नामकरण सांगली जिल्हा मिरज रेल्वे जंक्शन ला करण्यात यावे यासाठी मातंग समाज गेली 20 वर्षांपासून मागणी करत आहे.
मिरज रेल्वे जंक्शन चे साहित्यरत्न डॉ.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रेल्वे जंक्शन असे नामकरण करण्यात आले...
मिरज : साहितरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांचे नामकरण सांगली जिल्हा मिरज रेल्वे जंक्शन ला करण्यात यावे यासाठी मातंग समाज गेली 20 वर्षांपासून मागणी करत आहे. या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे.अनेक कथा,कादंबऱ्या,चित्रपट कथा,तमाशा वगनाट्य,कविता,पोवाडे लिहले,फकिरा ही कादंबरी जगातील अनेक भाषेत लिहिली गेली.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोवाड्याच्या माध्यमातून पहिल्यांदा परदेशात रशियाच्या चौकात पोहचवणारे महान साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे हे सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावचे सुपुत्र आहेत.किमान जिल्हयात त्यांचे मिरज रेल्वे जंक्शन ऐतिहासिक वास्तूला नामकरण करण्यासाठी जिल्ह्यातील जेष्ठ नेतेमंडळी व विविध पक्ष संघटनांनी वेळोवेळी महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून देखील कोणतीही आजपर्यंत दखल घेतली नाही.
यामुळे आक्रमक होऊन मातंग समाज बांधव युवा नेते प्रशांतभाऊ सदामते यांच्या नेतृत्वाखाली समाजबांधवांनी मिरज रेल्वे जंक्शनला साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे रेल्वे जंक्शन मिरज नामकरणचा फलक मंगळवारी रात्री मिरज रेल्वे जंक्शन वर लावण्यात आला.
सांगली जिल्हा
प्रतिनिधि - जगन्नाथ सकट
___________