कांदिवली पूर्व वार्ड क्र.३९ मधील सार्वजनिक शौचालयाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार!! | स्थानीय नगरसेवकाचे दुर्लक्ष मनपा अधिकाऱ्याची उडवाउडवीची उत्तरे...

कांदिवली पूर्वेला असलेल्या क्रांतीनगर या भागात वार्ड 39 मध्ये अजंठा चाळीतील सार्वजनिक शौचालयाची ड्रेनेज लाईन फुटून अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले या प्रकारानंतर नागरिकांनी कुरार पोलीस ठाणे येथे तक्रार केली असता  कामगारांनी पोलिसांच्या दबावानंतर सफाई केली या चाळीमध्ये ४० ते ५० घर आहे परंतु सदर शौचालयाची टाकीची सफाई वेळेस केली जात नसल्याचा आरोप स्थानीय रहिवाशांनी केला आहे.

कांदिवली पूर्व वार्ड क्र.३९ मधील सार्वजनिक शौचालयाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार!! | स्थानीय नगरसेवकाचे दुर्लक्ष मनपा अधिकाऱ्याची उडवाउडवीची उत्तरे...
Massive corruption in the work of public toilet in Kandivali East Ward No. 39 !! | Local corporator's negligence Municipal Corporation's vague answers ...
कांदिवली पूर्व वार्ड क्र.३९ मधील सार्वजनिक शौचालयाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार!! | स्थानीय नगरसेवकाचे दुर्लक्ष मनपा अधिकाऱ्याची उडवाउडवीची उत्तरे...
कांदिवली पूर्व वार्ड क्र.३९ मधील सार्वजनिक शौचालयाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार!! | स्थानीय नगरसेवकाचे दुर्लक्ष मनपा अधिकाऱ्याची उडवाउडवीची उत्तरे...
कांदिवली पूर्व वार्ड क्र.३९ मधील सार्वजनिक शौचालयाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार!! | स्थानीय नगरसेवकाचे दुर्लक्ष मनपा अधिकाऱ्याची उडवाउडवीची उत्तरे...

कांदिवली पूर्व वार्ड क्र.३९ मधील सार्वजनिक शौचालयाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार!!

स्थानीय नगरसेवकाचे दुर्लक्ष मनपा अधिकाऱ्याची उडवाउडवीची उत्तरे...

कांदिवली पूर्वेला असलेल्या क्रांतीनगर या भागात वार्ड 39 मध्ये अजंठा चाळीतील सार्वजनिक शौचालयाची ड्रेनेज लाईन फुटून अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले या प्रकारानंतर नागरिकांनी कुरार पोलीस ठाणे येथे तक्रार केली असता  कामगारांनी पोलिसांच्या दबावानंतर सफाई केली. या चाळीमध्ये ४० ते ५० घर आहे परंतु सदर शौचालयाची टाकीची सफाई वेळेस केली जात नसल्याचा आरोप स्थानीय रहिवाशांनी केला आहे.

वेळेवरसाफ सफाई करण्यास नगरसेविका सावंत व मनपा अधिकारी दुर्लक्ष करताहेत. शनिवारी सकाळी टाकी भरली होती ती साफ करण्यास आलेल्या कामगाराणी झाकण उघडले असता पावसाच्या पाण्यासारखं प्रवाह वाहत असलेल्या सुमारे तीन ते चार घरांमध्ये पाणी शिरले त्यामुळे याची तक्रार पी उत्तर महानगरपालिकेचे विक्रांत कांबळे यांच्याकडे केली आहे परंतु सदर ठिकाणी या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे व मनपा अधिकारी कांबळे आणि नगरसेविका विनया विष्णु सावंत यांचा या कामास वरदहस्त आहे असे बोलले जात आहे.

त्याच बरोबर अनुदत्त शाळेच्या बाजूला असलेले हनुमान चाळ येथील शौचालय सद्यस्थितीत चांगल्या अवस्थेत असताना सुद्धा हे शौचालय तोडून नवीन शौचालय बांधण्याचा घाट याठिकाणी नगरसेविका यांनी घातला आहे यात स्थानिक रहिवाशांनी विरोध केलेला आहे. याची विचारणा केली असता पालिकेचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.तरी सदर प्रकारची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी केली आहे. यावर आता काय कारवाई होते हे बघायचा आहे.

मुंबई

प्रतिनिधी - संजय बोर्डे

__________