मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले नवजात अर्भकाला जीवनदान...

मनसे पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका नवजात अर्भकाला जीवनदान मिळाल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले नवजात अर्भकाला जीवनदान...
Manse office bearers give life to newborn baby ...
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले नवजात अर्भकाला जीवनदान...
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले नवजात अर्भकाला जीवनदान...

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले नवजात अर्भकाला जीवनदान...

कल्याण : मनसे पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका नवजात अर्भकाला जीवनदान मिळाल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे.

कल्याण पूर्वेतील आमराई परिसरातील एका कचराकुंडीच्या ठिकाणी नवजात अर्भक असल्याची माहिती मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांना मिळाली. दुपारी दीडच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी योगिता गायकवाड आणि योगेश गव्हाणे यांनी लागलीच या ठिकाणी धाव घेत या पुरुष जातीच्या नवजात अर्भकाला या ठिकाणाहून उचलले.

याबाबतची माहिती कोळसेवाडी पोलिसांना देत या नवजात अर्भकाला घेऊन पालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय गाठले. मात्र याठिकाणी बालरोग तज्ञ नसल्याने येथील डॉक्टरांनी त्यांना खाजगी रुग्णालयात नेण्यास सांगितले. लागलीच या अर्भकाला कल्याण पश्चिमेतील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.

या अर्भकाची प्रकृती उत्तम असून कोळसेवाडी पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत. तर या नवजात अर्भकाला कचरा कुंडीत टाकणाऱ्या निदर्यी माता पित्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेचे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांनी केली आहे. दरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांनी वेळीच समयसूचकता दाखवल्याने या बाळाचे प्राण वाचले असून मनसे पदाधिकार्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________