इव्हेंटची सांगता फटाक्यांनी केली, मनसे आमदार राजू पाटील यांची शिवसेनेवर मार्मिक टीका...| मनसे आमदारांनी केले शिवसेना खासदाराचे अभिनंदन...
पत्री पूलाचे गर्डर लॉचिंगचे काम आज पहाटे पूर्ण झाले. याबाबत शिवसेना खासदार यांचे मनसे आमदार यांनी अभिनंदन केले आहे. मात्र फटाके फोडून इव्हेंट समारोप केला अशी मार्मिक टीका सुद्धा मनसे आमदार यांनी शिवसेनेवर केली.

इव्हेंटची सांगता फटाक्यांनी केली, मनसे आमदार राजू पाटील यांची शिवसेनेवर मार्मिक टीका...
मनसे आमदारांनी केले शिवसेना खासदाराचे अभिनंदन...
कल्याण : पत्री पूलाचे गर्डर लॉचिंगचे काम आज पहाटे पूर्ण झाले. याबाबत शिवसेना खासदार यांचे मनसे आमदार यांनी अभिनंदन केले आहे. मात्र फटाके फोडून इव्हेंट समारोप केला अशी मार्मिक टीका सुद्धा मनसे आमदार यांनी शिवसेनेवर केली.
कचोरे ते पत्री पूलाला जोडणार रस्ता गेले अनेक वर्ष अर्धवट आहे. हा रस्ता करताना नागरीकांची घरे तातडीने तोडली गेली. त्यांना बेघर करण्यात आले. त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही. दुसरीकडे हा रस्ता एका शिवसेनेच्या माजी महापौरांनी अडवून ठेवला आहे. असा आरोप मनसे आमदार पाटील यांनी दोन दिवसापूर्वी करत पत्रिपुलाच्या पाहणीसाठी आणि आयुक्तांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र आयुक्तांनी तेव्हा भेट नाकारली आणि पोलिसांनी सुद्धा मनसे आमदार यांना अडवले. मात्र आज केडीएमसी मुखालयात बाधितांसोबत मनसे आमदार राजू पाटील यांनी आयुक्तांची भेट घेतली.
यावेळी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा रस्ता पूर्ण करणार असून कचोरे ते पत्रीपूलाला जोडणाऱ्या रस्त्यात ज्यांची घरे गेली आहेत त्यांना मोबदला देऊ. आंबिवलीचा पूल सुद्धा पूर्ण करणार असल्याचे आयुक्तांनी सांगीतले. तर बाधितांसाठी एक धोरण तयार करा असे मनसे आमदार यांनी आयुक्तांना सांगीतले.
यावेळी पत्रकारांनी पाटील यांना गर्डर लॉचिंग बाबत प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले की लॉचिंगसाठी काम करणारे कर्मचारी अधिकारी, नगरसेवक आणि खासदार यांचे विशेष अभिनंदन, असेच काम करीत रहा, जेणेकरुन आम्हाला बोलण्याची वेळ येणार नाही. तर गर्डर टाकल्यानंतर पहाटे शिवसेनेतर्फे फटाके फोडण्यात आले याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी मार्मिक टोला देत गर्डर लॉचिंगच्या इव्हेंटची सांगता फटाके फोडून झाली असे सांगितले.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
___________