'मंगलम ज्वेलर्स' च्या दरोड्यातील दोन चोरट्याना झारखंडमधून अटक...
बोईसर येथील साई शॉपिंग सेंटरमधील मंगलम ज्वेलर्सवर गेल्या दहा दिवसांपूर्वी गॅस कटर व भिंत तोडून झालेल्या दरोड्याबाबत पोलिसांना दोन दरोडेखोर पकडण्यात यश आले असून त्याबाबत शनिवारी पालघर पोलीस अधिक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी केले होते.
'मंगलम ज्वेलर्स' च्या दरोड्यातील दोन चोरट्याना झारखंडमधून अटक...
बोईसर येथील साई शॉपिंग सेंटरमधील मंगलम ज्वेलर्सवर गेल्या दहा दिवसांपूर्वी गॅस कटर व भिंत तोडून झालेल्या दरोड्याबाबत पोलिसांना दोन दरोडेखोर पकडण्यात यश आले असून त्याबाबत शनिवारी पालघर पोलीस अधिक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी केले होते. यावेळी यांनी बोईसर येथील चित्रालय परिसरात २९ डिसेंबर रोजी रात्री श्रीरंग पाटील यांच्या मालकीचे साई शॉपिंग सेंटरमधील मंगलम ज्वेलर्स हे दुकान गॅस कटर आणि भिंत तोडून अज्ञात चोरट्याने ७ कोटी ६० लाख १७ हजार २३४ रुपयांचा मुद्देमालाचे सन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होते. याबाबत बोईसर पोलीस ठाण्यात दुकान मालकाने फिर्याद नोंदविली होती.
या अज्ञात चोरांना पकडण्यासाठी पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी बोईसर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप कसबे यांच्याकडे तपास सोपवुन गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या गुन्ह्याचा तपास लकरात लवकर लागावा यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे चार पथक तयार करण्याचे आदेश दिले होते.
या मोठ्या चोरीचा मुख्य सूत्रधार हा येथे काम करणारा वाचमन असावा असे गृहीत धरून तयार केलेली तपास पथके झारखंड राज्यात रवाना करण्यांत आली होती. त्यानुसार त्याचा तपास चालू असताना त्या पथकांना गुप्त बतमीदारांमार्फत माहिती मिळाली. त्यामहितीच्या आधारे पालघर पोलिसांच्या गेलेल्या पथकाने दोन आरोपी बदरुद्दीन कादिर शेख व हसीम फैजुद्दीन शेख यांना झारखंड राज्यातील खट्टीटोला येथून अटक केली आहे.
ताब्यात घेतलेल्या चोरट्यांकडून ३२४.८०० ग्रॅम सोने एकूण किमंत रु. १४ लाख व ५ लाख ५० हजार अशी १९ लाख ५० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चोरीच्या प्रकरणात आणखीन चोरटे सहभागी असल्याने पुढील तपासासाठी अजून सहा पथके तयार करून झारखंड, नेपाळ सीमा व पश्चिम बंगालला रवाना करण्यात आला आहेत. असे पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
पालघर
प्रतिनिधी - राजेंद्र पाटील
___________