पाऊस, गारपीट होण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत. राज्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागनं वर्तविली आहे.

पाऊस, गारपीट होण्याची शक्यता
maharashtra weather report

पाऊस, गारपीट होण्याची शक्यता

lightning and thunderstorm in maharashtra

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे  आहेत. राज्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागनं वर्तविली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं हजेरी लावलीय. हवामान विभागनं सिंधुदर्ग आणि सोलापूरसह विविध जिल्ह्यात आज ही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सिंधुदुर्गमध्ये शुक्रवारी सायंकाळी वादळी वारे आणि विजांच्या लखलखाटासह जोरदार पाऊस कोसळला. हवामान विभागानं राज्यात पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देखील दिला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. मात्र, खरिप हंगामासाठी शेतीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कुडाळ तालुक्यासह कणकवली व वैभववाडी तालुक्याला या पावसाने झोडपून काढले.

वादळी वाऱ्याने काही ठिकाणी पडझड झाली व फळपिकांचे मोठे नुकसान झाले.आज ही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.नागरिकांनी त्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आले आहे.

भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई यांच्या अंदाजानुसार 8 मे रोजी सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर 9 ते 11 मे दरम्यान जिल्ह्यात तुरळक प्रमाणात पाऊस होऊ शकतो.

भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगत राज्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच हवामान खात्याने काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत.

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाडा येथे पावसाच्या सरी बरसत आहेत. साताऱ्यात काही ठिकाणी गारपीटीसुद्धा नोंद झाली होती. या पार्श्वभूमीवर आता येत्या 1 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सातारा, सागंली, कोल्हापूर, रत्नागिरी, हिंगोली आणि  वाशिम जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

यंदा कोकणात मान्सून येत्या 1 जून रोजी दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  येत्या 15 मे आणि 31 मे रोजी पावसाचा अधिकृत अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही.

त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.