निंबाळकर राजघराण्याचे 29 वे वंशज रामराजेंचे हे वाद माहीत आहे का ?

रामराजे नाईक-निंबाळकर हे फलटणच्या निंबाळकर घराण्यातील 29वे वंशज आहेत. त्यामुळे राजकारणात त्यांचा आदर केला जातो.

निंबाळकर राजघराण्याचे 29 वे वंशज रामराजेंचे हे वाद माहीत आहे का ?
maharashtra powerful leader

निंबाळकर राजघराण्याचे 29 वे वंशज रामराजेंचे हे वाद माहीत आहे का ?

Do you know this argument of Ram Raje, the 29th descendant of Nimbalkar dynasty

 रामराजे नाईक-निंबाळकर हे फलटणच्या निंबाळकर घराण्यातील 29वे वंशज आहेत. त्यामुळे राजकारणात त्यांचा आदर केला जातो.

 सुसंस्कृत राजकारणी म्हणून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे पाहिले जाते. रामराजे नाईक-निंबाळकर हे फलटणच्या निंबाळकर घराण्यातील 29वे वंशज आहेत. त्यामुळे राजकारणात त्यांचा आदर केला जातो. मात्र, राजकारणात असल्यामुळे तेही राजकीय वादापासून दूर राहिलेले नाहीत.

रामराजे नाईक-निंबाळकर हे फलटणच्या निंबाळकर घराण्याचे 29वे वंशज आहेत. रामराजे हे एमएस्सी, एलएलएम आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते प्राध्यापक होते. रामराजे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगराध्यक्षपदापासून झाली.

त्यानंतर त्यांनी 1995मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली आणि विजयी झाले. शिवसेना-भाजप युतीच्या काळात कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करण्यात आले होते. त्याचे ते उपाध्यक्ष होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर ते राष्ट्रवादीत आले.

2004मध्ये ते जलसंपदा मंत्री झाले. सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा, कोरेगाव आणि माण या भागात त्यांचं चांगलं वर्चस्व आहे. या भागातील निवडणुकीत कुणाला निवडून द्यायचं एवढी त्यांची ताकद आहे.रामराजे यांच्याकडे अनेक वर्ष कृष्णा खोरे विकास महामंडळ होतं. त्यामुळे त्यांचा पाणी प्रश्नावर प्रचंड अभ्यास झाला. या विषयातील व्यासंगी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. 

रामराजे आणि उदयनराजे यांच्यात अनेक महिन्यांपासून वाद निर्माण झाले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोघांमधील वाद विकोपाला गेला होता. राष्ट्रवादीमध्ये असणारे उदयनराजे अचानक खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेले होते. त्यावेळी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजेंवर टीका केली होती.

त्यामुळे एक दिवस उदयनराजे यांनी थेट फलटनला जाऊन रामराजेंना चॅलेंज केलं होतं. त्यामुळे दोघांमधील वाद इतका ताणला गेला होता की खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण उदयनराजे यांच्या स्वभावामुळे ते शक्य झालं नाही. त्यामुळे या दोघांमधील वाद वेळोवेळी सातारा जिल्ह्याने पाहिला होता.

ऑक्टोबर 2020मध्ये या दोघांमधील वाद अखेर मिटला. दोघेही साताऱ्यात शासकीय विश्रामगृहात एकमेकांना भेटले आणि दोघांनीही दिलखुलास गप्पा मारल्या. त्यानंतर डिसेंबर 2020मध्ये पुण्यातील एका विवाह सोहळ्यात उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर समोरासमोर आले. ही भेट साधीसुधी नव्हती, तर दोघांनी चक्क गळाभेट घेतली. त्यामुळे दोघांमधील वादावर पडदा पडल्याचं स्पष्ट झालं.

रामराजे निंबाळकर यांनी माढ्याच्या पाण्यावरुन तत्कालीन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना, त्यांचा उल्लेख पिसाळलेली कुत्री असा केला होता. या टीकेला आमदार गोरे यांनी उत्तर दिलं होतं.

पिसाळलेले कुत्रे चावले तर या वयात इंजेक्शन सोसणार नाही”, अशी घणाघाती टीका जयकुमार गोरे यांनी केली होती.