खडकपाडा पोलिसांची नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट...| हरवलेले २७ मोबाईल केले परत...

कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. गेल्या २ वर्षात हरवलेले तब्बल २७ मोबाईल नागरिकांना परत केले आहेत.

खडकपाडा पोलिसांची नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट...|  हरवलेले २७ मोबाईल केले परत...
Unique Diwali gift of Khadakpada police to the citizens ... | Lost 27 mobiles returned ...
खडकपाडा पोलिसांची नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट...|  हरवलेले २७ मोबाईल केले परत...
खडकपाडा पोलिसांची नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट...|  हरवलेले २७ मोबाईल केले परत...
खडकपाडा पोलिसांची नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट...|  हरवलेले २७ मोबाईल केले परत...

खडकपाडा पोलिसांची नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट...

हरवलेले २७ मोबाईल केले परत...

कल्याण : कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. गेल्या २ वर्षात हरवलेले तब्बल २७ मोबाईल नागरिकांना परत केले आहेत. यामुळे या नागरिकांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार  खडकपाडा पोलीस ठाणे येथील दाखल हरवलेल्या मोबाईल तक्रारींचा कौशल्यपुर्ण व अथक परिश्रम घेवुन तपास केला असता, सन २०१९ व २०२० मध्ये एकुण २७ मोबाईल सुमारे ४ लाख २५ हजार रूपये किमंतीचे शोधण्याची उल्लेखनीय अशी कामगिरी खडकपाडा पोलीसांनी केलेली आहे. आज धनत्रयोदशीच्या दिवशी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याहस्ते हे मोबाईल संबंधित नागरिकांना देण्यात आले.

ही कामगिरी  अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त विवके पानसरे, एसीपी अनिल पोवार, व खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील पवार, पोलीस कॉन्स्टेबल कुशाल जाधव यांनी केली आहे.

कल्याण, ठाणे

 प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________