येत्या 3 मे पासून देशात लॉकडाऊनची चर्चा

देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशभरात पूर्णपणे लॉकडाऊन लावावा, अशी मागणी केली जात आहे.

येत्या 3 मे पासून देशात लॉकडाऊनची चर्चा
lockdown update

येत्या 3 मे पासून देशात लॉकडाऊनची चर्चा

Talk of lockdown in the country from May 3

 देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशभरात पूर्णपणे लॉकडाऊन लावावा, अशी मागणी केली जात आहे. 

देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात देशात चार लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशभरात पूर्णपणे लॉकडाऊन लावावा, अशी मागणी केली जात आहे.

याबाबत सोशल मीडियावर विविध मेसेज व्हायरल होत आहे. यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असल्याचा दावा केला जात आहे. मात्र या दाव्यामागील नेमकं सत्य काय? याच्यामागील वास्तव्य समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर 3 मेपासून 20 मेपर्यंत संपूर्ण भारतात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. असा मेसेज व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये एका चॅनेलची स्क्रिन दिसत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे.

यात केंद्र सरकारने 3 मेपासून 20 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्व राज्यांनी लॉकडाऊनबाबत तयारी दर्शवली आहे. याबाबतच्या नवी गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहे.

इंटरनेटवर व्हायरल होणारा हा मेसेज खरा आहे की खोटा? याची PIB च्या फॅक्ट चेक युनिटने पडताळणी केली. याची सखोल चौकशी केल्यानंतर हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा दावा बनावट आहे. केंद्र सरकारने 3 मे ते 20 मे दरम्यान संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची घोषणा केल्याचा दावा PIB ने खोटा असल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही, असे पीआयबीने सांगितले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून विविध मेसेज व्हायरल होत आहेत. यात अनेक दावे केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे जर तुम्हालाही कोणतीही बातमी किंवा माहितीत दिलेल्या तथ्याबद्दल शंका असल्यास तुम्ही ते पीआयबी फॅक्टचेकवर पाठवू शकता.

याची सखोल चौकशी केली जाईल. ही चौकशी केल्यानंतर तुम्हाला याची योग्य ती माहिती दिली जाईल.