लाखोंच्या घरफोड्या करनाऱ्या 'गब्बर' ला कोनगाव पोलिसांनी  केली अटक...

लाखोंच्या घरफोडीच्या अनेक गुन्ह्यात सहभाग असलेल्या 'गब्बर' नावाचा सराईत गुन्हेगाराला कोनगाव पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांसह  अटक केली आहे.

लाखोंच्या घरफोड्या करनाऱ्या 'गब्बर' ला कोनगाव पोलिसांनी  केली अटक...
Kongaon police arrest 'Gabbar' for burglary...

लाखोंच्या घरफोड्या करनाऱ्या 'गब्बर' ला कोनगाव पोलिसांनी  केली अटक...

लाखोंच्या घरफोडीच्या अनेक गुन्ह्यात सहभाग असलेल्या 'गब्बर' नावाचा सराईत गुन्हेगाराला कोनगाव पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांसह  अटक केली आहे. त्याने आपल्या दोन साथीदारां सह भिवंडी तालुक्यातील भूमी इंडस्ट्रियल मधील कृष्णा फॅब्रीक्सच्या गोदामातून ७ लाख ६८ हजार रुपयांचे सोफ्या करिता लागणारे कापडाचे वेगवेगळ्या कंपनीचे रोल एका टेम्पोत भरून लंपास केले होते.

या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात जबरी घर फोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी गब्बर उर्फ अजय हरिजन (वय, ३५, रा. एरोली, नवीमुंबई ) मोहम्मद इरफान जैनुलआबिदिन शेख ( वय, २७,रा, वडाळा मुंबई) संतोष खरात ( वय, ३८, रा. एरोली, नवीमुंबई ) असे लाखोंच्या घरफोडीत  अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. या आरोपी त्रिकूटाकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्दे मालासह टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

भिवंडी झोन -2 चे पोलीस उपायुक्त श्री. योगेश चव्हाण यांनि  प्रतिक्रिया देतांना सांगितले की, सीसीटीव्ही फुटजेमुळे 'गब्बर' पोलिसांच्या जाळ्यात अडकला.घरफोडीचे गंभीर स्वरूप पाहता सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढाले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अभिजित पाटील, नितीन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक जे. आर. शेरखाने , यांच्यासह पोलीस पथकाने तपासला गती देत, चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक टेम्पो त्या दिवशी जाताना दिसला , या टेम्पोच्या नंबर वरून पोलीस घरफोड्या 'गब्बर' व त्याच्या साथीदारां पर्यत पोचवली आणि त्याला बेड्या ठोकल्या.

या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असलेला गब्बर हा  आरोपी काही दिवसांपूर्वीच जेलमधून सुटला होता. त्यांनतर त्याने पुन्हा घरफोडी करण्यासाठी दोन साथीदारांसह कट रचला. त्यानुसार २८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कृष्णा फॅब्रीक्सच्या गोदामात साठवलेले महागडे सामान या टोळीने लंपास केले. विशेष म्हणजे गब्बर हा घरफोडीतील सराईत गुन्हेगार असून तो मूळचा उत्तर प्रदेशच्या बनरसचा रहिवाशी आहे. त्याच्यावर अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती भिवंडी पोलिसांनी दिली आहे.

भिवंडी

प्रतिनिधी - सत्यवान तरे

___________