बोरगांव येथे कणसरा चौकात किसान सभा  मार्क्सवादी, आणि  DYFI वतीने रास्तारोको आंदोलन...| केंद्र सरकारच्या खाजगीकरण क्षेत्र  धोरनाविरुद्ध निदर्शने...

सुरगाणा तालुक्यातील  बोरगाव  येथे  केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधायकास, कामगार विरोधी कायदे,वीज विधेयक विरोधात अखिल भारतीय किसान सभा,मार्क्सवादी पक्ष आणि DYFI संघटनेमार्फत रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

बोरगांव येथे कणसरा चौकात किसान सभा  मार्क्सवादी, आणि  DYFI वतीने रास्तारोको आंदोलन...| केंद्र सरकारच्या खाजगीकरण क्षेत्र  धोरनाविरुद्ध निदर्शने...
Kisan Sabha Marxist at Kansara Chowk in Borgaon, and Rastaroko agitation on behalf of DYFI ...| Protests against the central government's privatization sector policy ...
बोरगांव येथे कणसरा चौकात किसान सभा  मार्क्सवादी, आणि  DYFI वतीने रास्तारोको आंदोलन...| केंद्र सरकारच्या खाजगीकरण क्षेत्र  धोरनाविरुद्ध निदर्शने...

बोरगांव येथे कणसरा चौकात किसान सभा  मार्क्सवादी, आणि  DYFI वतीने रास्तारोको आंदोलन...

केंद्र सरकारच्या खाजगीकरण क्षेत्र  धोरनाविरुद्ध निदर्शने...

सुरगाणा तालुक्यातील  बोरगाव  येथे  केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधायकास, कामगार विरोधी कायदे,वीज विधेयक विरोधात अखिल भारतीय किसान सभा,मार्क्सवादी पक्ष आणि DYFI संघटनेमार्फत रास्तारोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार कॉम्रेड जे. पी. गावित यांच्या मार्गदर्शनाखाली  पार पडले.

केन्द्र सरकारने  खाजगीकरण क्षेत्र करण्याचे व भांडवलदारांच्या कंपन्या, कार्पोरेट घराणे आणि मर्जीतील विशिष्ट व्यक्तींना फायदा देण्याच्या उद्देशाने प्रस्तावित केला असून ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बाबतीतील ३ कायदे घाईगडबडीने लोकसभेत पारित करून घेतले, हे  कायदे  अत्यंत घातक असून खाजगी कंपन्यांना जास्तीत जास्त फायदे देण्याच्या उद्देशाने प्रस्तावित केला आहे.

याचबरोबर  तालुक्यातील  

1)"ड" यादीतील सर्व गरजू लाभधारक कुटुंबांना सर्रास घरे देण्यात यावे.

2) वंचित राहीलेल्या गरजू लोकांना "ड" यादीत समाविस्ट करा.

3) शबरी आवास योजना लाभार्थ्यांना लाभ द्या.

4)धरणे बांधून घरे गावे बडवून गरिब आदीवासी जनतेला विस्थपित करु नये.

5) नाशिक जिल्ह्यातील 154 गावे इको  सैंसेटिव्ह झोन मध्ये  टाकुन गरिब जनतेवर मोठा अन्याय केला आहे.ते रद्द करा. अशा विविध मागण्या घेऊन हे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

२६/११ च्या मुंबई हल्यात शहीद झालेल्या शहीद जवानांना   आंदोलन कार्यकर्त्यांनी   क्रांतीकरी लाल सलाम देत भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी सापुतारा(गुजरात) महामार्ग सुरगाणा  तालुक्यातील बोरगांव  येथे 4 तास कार्यकत्यांनी रोखून धरला होता. यामुळे नाशिक कडे येणारी आणि गुजरात कडे जाणारी दोन्ह्या बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. 

या आंदोलनामध्ये  किसानसभा तालुका सेक्रेटरी  कॉ. सुभाष चौधरी, कॉ.सभापती मनिषा महाले, कॉ. जि. प. सदस्य भिका राठोड, कॉ. जनार्दन भोये,कॉ. सुरेश गवळी,कॉ. रामचंद्र गांगुर्डे,तुळशीराम खोटरे, पुंडलिक भोये, संदीप भोये, अशोक भोये,हेमंत भुसारे, भागवत पवार, भरत भोये, खन्डू भोये, बाळा भोये  यशवंत पवार, हरी कडाळी, सोमनाथ दळवी, भगवान गांगुर्डे, हिरा गवित, खुशाल शिंदे, बयाजी धुळे, डिगु भोये, लक्ष्मण बोरसे , मधू जोपले, आनंदा भोय, कृष्णा गायकवाड़, धर्मा पवार, मनोहर गायकवाड़, सोमनाथ गवळी, रंगणाथ पवार, डी.गवळी ,पुनाजी गवळी , भिमा पाटिल, सुरेश गवळी, राहुल अहेर, विजया घांगळे, दनियल गांगुर्डे, वसंत बागुल, तसेच तालुक्यातील माकपचे  सर्व कार्यकर्ते , नागरिक,सरपंच, उप सरपंच,  आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

सुरगाणा

प्रतिनिधी - अशोक भोये

___________