येवला येथे खटपट युवा मंच तर्फे राष्ट्रीय युवा गौरव दिन व भारत मातेचे महान सुपुत्र युगपुरूष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहित साजरी करण्यात आली.
येवला युवा कार्यक्रम व क्रीड़ा मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केन्द्र नाशिक व स्वयंसेवी संस्था खटपट युवा मंच ,युवा विकास केंद्र येवला यांच्या वतीने युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त राष्ट्रीय युवा सप्ताह व राष्ट्रीय युवा गौरव दिन संत नामदेव पथ कॉर्नर येथे मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.

येवला येथे खटपट युवा मंच तर्फे राष्ट्रीय युवा गौरव दिन व भारत मातेचे महान सुपुत्र युगपुरूष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहित साजरी करण्यात आली...
येवला युवा कार्यक्रम व क्रीड़ा मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केन्द्र नाशिक व स्वयंसेवी संस्था खटपट युवा मंच ,युवा विकास केंद्र येवला यांच्या वतीने युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त राष्ट्रीय युवा सप्ताह व राष्ट्रीय युवा गौरव दिन संत नामदेव पथ कॉर्नर येथे मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.राष्ट्रीय युवासप्ताहचे 32 वे वर्ष आहे.सप्ताहाचे उद्घाटन प्रसिद्ध व्यंगचित्रकार मा श्री प्रभाकर झळके यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय लश्करात चीन सिमेवर कार्यरत असलेले तालुक्याचे भूमिपुत्र श्री संदीप शिंदे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी अरुण येवले,रामेश्वर हाबड़े, संजय गायकवाड़,रत्नाकर खैरे, शैलेश गुजराथी,सुरेश गोंधळी, दत्ता लगड,विजय पौंदे, आदी मान्यवरांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण अभिवादन केले.
खटपट युवा मंचच्या विविध उपक्रमचे मान्यवरानी कौतुक केले. राष्ट्रीय युवा गौरव दिननिमित्त डॉ भूषण सिनकर,डॉ संजय जाधव,योगेश सोनावणे,गोकुळ गांगुर्ड,जयवंत खांबेकर,मयूर वालुंज,प्रतीक जाधव,बबलू गुप्ता,कमलेश गुप्ता,आदिंचा सत्कार करण्यात आला.
खटपट युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक मुकेश लचके यांनी प्रास्ताविक केले नईम मणियार यांनी सूत्रसंचालन केले.दत्ता नागडेकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्विते साठी राम तुपसाखरे,पुरुषोत्तम रहाणे, राजेश माळवे,सोमनाथ शिंदे,बळीराम शिंदे,अशोक टिभे, संदीप लचके,सिताराम भाम्बारे, रमाकांत खंदारे, प्रकाश लग्गड,वरद लचके,मनोज तुपसाखारे इत्यादी नी परिश्रम घेतले.
येवला तालुका
प्रतिनिधी - शशिकांत जगताप
___________