केडीएमसीचे साथरोगावर चांगले नियंत्रण - आरोग्य मंत्री राजेश टोपे

एकेकाळी कल्याण डोंबिवली कोरोनाचं हॉटस्पॉट होतं, परंतु आता कल्याण डोंबिवलीतील अँक्टिव केसेस खुप कमी असून महापालिका प्रशासनाने कोरोनावर उत्तम नियंत्रण मिळवलं आहे, अशा शब्दात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि प्रशासनाची प्रशंसा करुन कौतुकाची थाप दिली.

केडीएमसीचे साथरोगावर चांगले नियंत्रण - आरोग्य मंत्री राजेश टोपे
KDMC has better control over communicable diseases - Health Minister Rajesh Tope
केडीएमसीचे साथरोगावर चांगले नियंत्रण - आरोग्य मंत्री राजेश टोपे
केडीएमसीचे साथरोगावर चांगले नियंत्रण - आरोग्य मंत्री राजेश टोपे
केडीएमसीचे साथरोगावर चांगले नियंत्रण - आरोग्य मंत्री राजेश टोपे

केडीएमसीचे साथरोगावर चांगले नियंत्रण - आरोग्य मंत्री राजेश टोपे

कल्याण : एकेकाळी कल्याण डोंबिवली कोरोनाचं हॉटस्पॉट होतं, परंतु आता कल्याण डोंबिवलीतील अँक्टिव केसेस खुप कमी असून महापालिका प्रशासनाने कोरोनावर उत्तम नियंत्रण मिळवलं आहे, अशा शब्दात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि प्रशासनाची प्रशंसा करुन कौतुकाची थाप दिली. महापालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात पत्रकारांशी बोलत होते. तत्पुर्वी राजेश टोपे यांनी महापालिकेने नुकत्याच‍ सुरु केलेल्या लाल चौकी आर्ट गॅलरी येथील कोविड समर्पित रुग्णालयाची पाहणी केली.

महापालिकेत शासनाचे वैदयकीय आरोग्य अधिकारी नसल्याने एक उत्तम वैदयकीय आरोग्य अधिकारी उपलब्ध करुन देणेबाबत निर्देश त्यांनी उपस्थित असलेल्या ठाणे जिल्हा आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांना दिले. महापालिकेत फिजीशियन कमी असल्याने तेही देण्याची व्यवस्था करु अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ठाणे जिल्हयात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी स्वतंत्र आरोग्य संचनालयाला शासनाने मंजूरी दिली आहे. नुकतेच प्रशासनाने सादर केलेल्या पीपीपी तत्वावर हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावास महासभेने मंजुरी दिली आहे, या संकल्पनेचे कौतुक करत आरक्षित भुखंडावर पीपीपी तत्वावर रुग्णालय व मेडिकल कॉलेज उभारण्यास शासन सहाय्य करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याठिकाणी गरीब लोकांना सवलतीत आरोग्य सेवा देणे संबंधित विकासकास बंधनकारक राहील, असेही ते यावेळी म्हणाले.

साथीच्या रोगासाठी ठाणे परिसरात लवकरच साथरोग रुग्णालय उभे राहणार असून दिवसाला ९०० पेशंट जरी आले तरी त्यांच्यावर उपचार करता येतील, अशी यंत्रणा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने उभारली असल्याचे सांगुन टोपे यांनी पालिकेच्या कामाचे कौतुक केले. डिसेंबर एन्डच्या वेळी दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रत्येकाने मास्क परिधान करणे व सोशल डिस्टंसिंग पाळणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

कल्याण, ठाणे

 प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________