कल्याण डोंबिवली कोरोना अपडेट्स | Kalyan Dombivli Corona effect

कल्याण डोंबिवलीत ३३० नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली कोरोना अपडेट्स  | Kalyan Dombivli Corona effect
coronavirus effect

कल्याण डोंबिवली कोरोना अपडेट्स | Kalyan Dombivli corna effect

कल्याण डोंबिवलीत ३३० नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

२३,५४७ एकूण रुग्ण तर ४७५ जणांचा आतापर्यंत मृत्यू

कल्याण (Kalyan) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात  आज ३३० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ३०९ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३३० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २३,५४७ झाली आहे. यामध्ये ४२०२ रुग्ण उपचार घेत असून १८,८७० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ४७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या ३३० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -७६,  कल्याण प.-९७,  डोंबिवली पूर्व-८९, डोंबिवली प-२५, मांडा टिटवाळा २९, मोहना ९  तर पिसवली येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९६ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून,  १६ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ८ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून,  १२ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून, ६ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे  प्रतिनिधी -

कुणाल म्हात्रे 

_________

Also see : कोरोना दीर्घकाळ पाठ सोडणार नाही; WHO चा इशारा...! | Corona won’t leave the back for long; WHO warning ...! | covid pandemic

https://www.theganimikava.com/covid-pandemic