भरदिवसा बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स दुकानावर दरोडा...| ३० तोळे सोन्यासह दीड लाखांची रोकड लंपास; एक चोरटा गजाआड...

भरदिवसा रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानात घुसून  बंदुकीच्या धाकावर दुकानातील लाखोंचा ऐवज लुटून पसार झाले. याच दरम्यान या चोरट्यानी धारधार शस्त्राने ज्वेलर्सचे मालक आणि कर्मचाऱ्याला जखमी केले.

भरदिवसा बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स दुकानावर दरोडा...| ३० तोळे सोन्यासह दीड लाखांची रोकड लंपास; एक चोरटा गजाआड...
Jewelry shop robbery at gunpoint all day ... | 1.5 lakh cash lamps with 30 pounds of gold; A thief ...
भरदिवसा बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स दुकानावर दरोडा...| ३० तोळे सोन्यासह दीड लाखांची रोकड लंपास; एक चोरटा गजाआड...
भरदिवसा बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स दुकानावर दरोडा...| ३० तोळे सोन्यासह दीड लाखांची रोकड लंपास; एक चोरटा गजाआड...
भरदिवसा बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स दुकानावर दरोडा...| ३० तोळे सोन्यासह दीड लाखांची रोकड लंपास; एक चोरटा गजाआड...

भरदिवसा बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स दुकानावर दरोडा...

३० तोळे सोन्यासह दीड लाखांची रोकड लंपास; एक चोरटा गजाआड...

कल्याण : भरदिवसा रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानात घुसून  बंदुकीच्या धाकावर दुकानातील लाखोंचा ऐवज लुटून पसार झाले. याच दरम्यान या चोरट्यानी धारधार शस्त्राने ज्वेलर्सचे मालक आणि कर्मचाऱ्याला जखमी केले. दरम्यान या झटापटीत एका चोरट्याला दुकान मालकाने पकडले. तर त्याचे साथीदार मात्र पसार झाले. या चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या पसार झालेल्या दोन्ही साथीदारांचा शोध सुरू केला आहे. हा लुटीचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून भरदिवसा घडलेल्या या घटनेने कल्याणात खळबळ उडाली आहे.

कल्याण पूर्वेतील नांदीवली परिसरात वैष्णवी ज्वेलर्स  दुकान आहे. या दुकानात काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तीन चोरटे शिरले. दुकानात शिरताच संधी साधून त्यांनी अपल्याजवळील हत्याराने कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला. बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील ३० तोळे दागिने आणि १ लाख ६० हजारांची रोकड घेऊन पसार होण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान झालेल्या झटापटीत यामधील एक चोरटा कर्मचाऱ्यांच्या हाती लागला तर त्याचे दोन्ही साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले.  ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. तीन पैकी दोन चोरटे संधीचा फायदा घेत पळून गेले. या चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी या चोरट्याला अटक करत पसार झालेल्या त्याच्या दोघा साथीदारांचा शोध सुरू केला असल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे व.पो.नि.  शाहूराजे साळवे यांनी दिली.

कल्याण, ठाणे

 प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________