महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजना मार्फत सफाळे ग्रामपंचायत हाॅलमध्ये झाली बैठक...

सफाळे येथे  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजना  तसेच आयआयटी (मुंबई) व उंबरपाडा - नंदाडे १७ गाव पाणी पुरवठा समिती सदस्य  यांच्या सोबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजना मार्फत सफाळे ग्रामपंचायत हाॅलमध्ये झाली बैठक...
Meeting was held at Safale Gram Panchayat Hall through Maharashtra Jeevan Pradhikaran and Zilla Parishad Water Supply Scheme ...

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजना मार्फत सफाळे ग्रामपंचायत हाॅलमध्ये झाली बैठक...

सफाळे येथे  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजना  तसेच आयआयटी (मुंबई) व उंबरपाडा - नंदाडे १७ गाव पाणी पुरवठा समिती सदस्य  यांच्या सोबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती.या दरम्यान आय आय टी मंबई चे प्रोफेसर डॉ. प्रदिप काळबर  यांनी मार्गदर्शन करतांना ही योजना साध्या आणि सोप्या पद्धतीने पुनर्जीवित करण्याच्या दृष्टीने या योजने अंतर्गत येणाऱ्या गावांतील सरपंच आणि तेथील लोकप्रतिनिधींना  एकत्र येऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.ज्या गावात कमी जास्त प्रमाणात पाणी पोहोचत आहे अश्या गावात आय आय टी मार्फत सर्वे करून पुढील काळात तेथील पाण्याचा प्रश्न सोडविण्या संबंधी कार्यवाही केली जाईल असे सांगितले.
या बैठकी दरम्यान आमदार राजेश पाटील यांनी सांगितले की,येत्या काही काळात या विभागात पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासंदर्भात आणि ग्रामपंचायत सफाळे यांनी केलेल्या पाण्याच्या नियोजनाचे कौतुक केले.तसेच या वेळी बहुजन विकास आघाडीचे नेते  प्रवीण राऊत  यांनी ही योजना नव्याने आखताना येत्या १५-२० वर्शांचा अंदाज घेताना वाढणारी लोकसंख्येचं भान ठेवून ही आखावी आणी ह्यासाठी प्रयत्न ह्वावेत अशी इच्छा प्रकट केली.

उपस्तितांपैकी काही  सरपंचांनी गावात प्रत्येक नागरीकापर्यंत पाणी पोहोचवताना येणार्या अनेक अडचणी मांडल्या व त्या आय आय टि मंबई, महा. जिवन प्राधिकारण व जि. परिषद पालघर ह्यांच्या संयुक्त मार्गदर्शनाने सोडविण्याचे सुचविले.लवकरच गावपातळीवर चर्चा करून सर्वे करून पूढील वाटचाल ठरविण्याचे आजच्या मिटिंगच्या अनुषंगाने ठरविण्यात आले.

या  बैठकीसाठी जीवन प्राधिकरण चे महेश पाटील,जिल्हा परिषद पालघरचे पाणीपुरवठा DE कुलकर्णी साहेब , पालघर गट विकास अधिकारी जगताप साहेब पालघर पंचायत समितीचे उसभापती चेतन पाटील,जिल्हा परिषद सदस्या मनीषा  निमकर ,जि.प.सदस्या सरीता सुतार,पंचायत समितीचे सदस्य सुरेश तरे ,रुपेश धांगडा, सफाळे ग्रामपंचायत सरपंच अमोद जाधव, उपसरपंच राजेश म्हात्रे,बहुजन विकास आघाडीचे पी टी पाटील सर समीर म्हात्रे,आणि संबंधित गावातील सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच उपस्थित होते.

पालघर

प्रतिनिधी - रविंद्र घरत

_______