जासमीन एसेसिरीज यंग इंडिया कंपनीच्या कामगारांची दिवाळी झाली गोड...| वाटाघाटी यशस्वी झाल्याने कामगारांनी प्रदीप वाघमारे यांचे आभार व्यक्त केले...
गेल्या दोन ते अडीज महिन्या पासून जासमीन असेसिरीज यंग इंडिया ( गामी इंडस्ट्रीज,पावणे ओद्योगिक क्षेत्र,नवी मुंबई) कंपनीच्या 14 कामगारांना कंपनी मालकाने पगार दिला नव्हता. कामगारांनी मालकाला विनंत्या करूनही तो पगार द्यायला टाळाटाळ करत होता.दिवाळी तोंडावर आली असतांना हातात पगार नाही म्हणून कामगार चिंतातुर झाले होते.
जासमीन एसेसिरीज यंग इंडिया कंपनीच्या कामगारांची दिवाळी झाली गोड...
वाटाघाटी यशस्वी झाल्याने कामगारांनी प्रदीप वाघमारे यांचे आभार व्यक्त केले...
नवी मुंबई : गेल्या दोन ते अडीज महिन्या पासून जासमीन असेसिरीज यंग इंडिया ( गामी इंडस्ट्रीज,पावणे ओद्योगिक क्षेत्र,नवी मुंबई) कंपनीच्या 14 कामगारांना कंपनी मालकाने पगार दिला नव्हता. कामगारांनी मालकाला विनंत्या करूनही तो पगार द्यायला टाळाटाळ करत होता.दिवाळी तोंडावर आली असतांना हातात पगार नाही म्हणून कामगार चिंतातुर झाले होते. अशात त्यांनी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे नवी मुंबई उपाध्यक्ष प्रदीप बी.वाघमारे आणि इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आपले गाऱ्हाणे मांडले व पगार मिळवून देण्या बाबत विनंती केली. हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे नवी मुंबई उपाध्यक्ष प्रदीप बी.वाघमारे यांनी तुमचा पगार 100 % मिळेल अशी हमी देऊन कामगारांना दिलासा दिला.
कामगारांनी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारले. त्या नंतर कंपनीचे मालक श्री.अमोघ पाडगावकर यांच्याशी वाटाघाटी आणि चर्चा करून जागच्या जागी सर्व कामगारांच्या बँक खात्यात त्यांची थकीत असलेली पूर्ण देणी आणि चालू महिन्याचा पगार ट्रान्स्फर करण्यात आला. ऐन दिवाळीच्या काळात कामगारांच्या खात्यात पगार जमा झाल्याने कामगारांनी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे संस्थापक / अध्यक्ष ,कामगार नेते श्री.निलेश (आप्पा) पराडकर महाराष्ट्र सरचिटनिस घनश्याम नाईक, यांचे आभार मानले.
तसेच नवी मुंबई युनिटचे जिल्हा अध्यक्ष संतोष घोसाळकर,उपाध्यक्ष प्रदीप बी.वाघमारे सरचिटणीस एकनाथ दुखंडे,उपाध्यक्ष ऍड.कौस्तुभ मोरे,खजिनदार बाळा पाटील, यांचे मनस्वी आभार मानले.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
__________