एमजीएम प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे वसाहतीतील नागरिक व लहान मुलांच्या जीवितांस प्रचंड प्रमाणात धोका निर्माण झालेला असुन त्यामुळे एमजीएम तात्काळ प्रशासना अंतर्गत शाळा-कॉलेज गोल्फ मैदान यांची परवानगी रद्द करून ते बंद करण्यात यावे...

औरंगाबाद 07/03/2020 रोजी m.g.m. प्रशासनाच्या अखत्यारीत येणार पडेगाव मिटमिटा येथील गोल्फ क्लब कोणतीही सुरक्षा भिंत अथवा कवच नसणार दोन शेततळे यापैकी एमजीएम शाळा कॉलेज जवळ असलेल्या एक शेततळ्यामध्ये पडेगाव न्यू अन्सार कॉलनी येथील रहिवाशी एका शाळकरी मुलगा नामे.अयान अमजद बेग याचा शेततळ्याला कुठेली ही सुरक्षा भिंत/कुंपण नसल्यामुळे शेततळ्यामध्ये पडून शाळकरी मुलाचा मृत्यू झालेला आहे.

एमजीएम प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे वसाहतीतील नागरिक व लहान मुलांच्या जीवितांस प्रचंड प्रमाणात धोका निर्माण झालेला असुन त्यामुळे एमजीएम तात्काळ प्रशासना अंतर्गत शाळा-कॉलेज गोल्फ मैदान यांची परवानगी रद्द करून ते बंद करण्यात यावे...

औरंगाबाद 07/03/2020 रोजी m.g.m. प्रशासनाच्या अखत्यारीत येणार पडेगाव मिटमिटा येथील गोल्फ क्लब कोणतीही सुरक्षा भिंत अथवा कवच नसणार दोन शेततळे यापैकी एमजीएम शाळा कॉलेज जवळ असलेल्या एक शेततळ्यामध्ये पडेगाव न्यू अन्सार कॉलनी येथील रहिवाशी एका शाळकरी मुलगा नामे.अयान अमजद बेग याचा शेततळ्याला कुठेली ही सुरक्षा भिंत/कुंपण नसल्यामुळे शेततळ्यामध्ये पडून शाळकरी मुलाचा मृत्यू झालेला आहे.

बेजबाबदार एमजीएम प्रशासन तसेच गोल्फ क्लब शाळा-कॉलेजची जबाबदारी असणारे सर्व पदाधिकारी यांच्या विरोधात दि.16/10/2020, 15/09/2020 तसेच स्मारण तक्रार दि.05/11/2020 मयत यांच्या कुटुंबीयांचा तर्फे देण्यात आलेल्या होत्या. सदरील तक्रारींमध्ये लहान मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असलेला एमजीएम प्रशासन व इतर त्यांच्यावर तात्काळ 304 ए भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कड कायदेशीर कारवाई करण्यात यावे अशी अर्जाद्वारे तक्रारी विनंती करण्यात आली होती.

परंतु एमजीएम प्रशासन अत्यंत मोठे प्रतिष्ठान असल्यामुळे त्या गोष्टीची किंवा तक्रारीची साधी दखलही सुद्धा घेण्यात आलेली नाही. एमजीएम प्रशासनाने सुरू केलेल्या सुरक्षिततेची कोणतीही जबाबदारी नसलेले दोन्ही न्यू अंन्सर कॉलनी मिटमिटा पडेगाव येथील शेततळे तात्काळ सील करून बुजवून टाकने बाबत तसेच एम जी एम शाळा-कॉलेज गोल्फ मैदान यांची परवानगी तात्काळ रद्द करून ते बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती.

कारण की दोन्ही शेततळ्या भोवती कोणतेही सुरक्षा भिंत नसल्यामुळे तसेच कोणतीही प्रकारची सुरक्षा व्यवस्था एमजीएम प्रशासनाने न केल्याने शाळेत येणाऱ्या मुलांचा तसेच पडेगाव मिटमिटा न्यु अन्सर कॉलनी येथील रहिवाशी मुलाचा तेथील येणाऱ्या लोकांचा शेततळ्यामध्ये बुडून होणारा संभाव मृत्यूचा धोका लक्षात घेऊन तात्काळ एमजीएम प्रशासना शाळा कॉलेज गोल्ड मैदान यांची परवानगी रद्द करून शेततळे बुजवून बंद करण्यात यावे. एमजीएम प्रशासनाच्या अखत्यारीत असलेले पडेगाव मिटमिटा न्यु अंन्सार कॉलनी येथील शेततळ्यामध्ये बुडून तीन जणांचा मृत्यू झालेला असतानासुद्धा बेजबाबदार एमजीएम प्रशासनावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

याचा अर्थ असा की सामान्य जनतेस शाळकरी मुलांना इतरांना m.g.m. प्रशासनाने व्यक्तीस धरलेले आहे व त्यांच्या मृत्यू त्यांच्या बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. त्यामुळे येणाऱ्या दहा दिवसांच्या आत एमजीएम प्रशासनावर 304 प्रमाणे गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावे. तसेच लोकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या बेजबाबदार एमजीएम प्रशासनाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा-कॉलेज गोल्फ मैदान व दोन्ही शेततळे सील करून बुजवून टाकण्यात यावे.

लोकशाही पद्धतीने तेव्हा आंदोलन शहराच्या विविध ठिकाणी छेडण्यात येईल त्यात मध्ये प्रमुखाने एमजीएम प्रशासनाची इमारत एमजीएम प्रशासन हॉस्पिटल औरंगाबाद पडेगाव मिटमिटा कॉलनी येथील मृत्यूचा सापळा एमजीएम शेततळे शाळा-कॉलेज गोल्ड मैदान यांच्या कडे जाणाऱ्या रस्त्यावर व शहरातील विविध ठिकाणी बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाला न्याय देण्यासाठी व बेजबाबदार निष्काळजी शाळकरी मुलांच्या बुडून मृत्यू कारणीभूत असलेले प्रशासनावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असे मयत कुटुंबीयांनी सांगितले संदर्भातील निवेदन दि.11/11 2020 रोजी मा.पोलिस आयुक्तांना देण्यात आलेले होते तक्रारी व निवेदने देऊन सुद्धा  कुठलीही कारवाई एमजीएम प्रशासनावर झालेली नाही बेजबाबदार लोकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या एमजीTएम प्रशासनावर कायदेशीर कारवाई होईपर्यंत साखळी बेमुदत उपोषण कार्यकर्त्यांसह एमजीएम प्रशासनाच्या दवाखान्यासमोर सिडको दि.24/11/2020  सुरू करण्यात आले आहे.

एमजीएम प्रशासनावर तडक कायदेशीर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साखळी बेमुदत उपोषण चालूच राहील असे मयत कुटुंबीयांनी सांगितले. साखळी बेमुदत उपोषण सहभागी तब्बसुम पठाण.जरीना बेग सुरावर खान आदी उपस्थित होते.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

___________