देशभरात 18 ते 44 वयोगटातील कोरोना लसीकरणाला सुरुवात

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. भारतात 1 मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

देशभरात 18 ते 44 वयोगटातील कोरोना लसीकरणाला सुरुवात
india Corona Vaccination

 देशभरात 18 ते 44 वयोगटातील कोरोना लसीकरणाला सुरुवात

18-44 Age Group Vaccination started

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. भारतात 1 मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

देशभरात काल दिवसभरात 18 ते 44 वर्षे वयोगटातील 84 हजार 599 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस  घेतला. तर महाराष्ट्रात संध्याकाळी सहापर्यंत जवळपास 11 हजार 492 लाभार्थ्यांनी लस घेतली. 

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 1 मे पासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. यावेळी 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. दरम्यान काही ठिकाणी लसीची कमतरता असल्याने लसीकरण प्रक्रिया सुरु झाली नाही.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 26 जिल्ह्यात 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली. यासाठी एकूण 132 लसीकरण केंद्र कार्यरत होते. यानुसार संध्याकाळी सहापर्यंत जवळपास 11 हजार 492 लाभार्थ्यांनी लस घेतली. तर उर्वरित जिल्ह्यात आजपासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे झारखंड सरकारने केंद्रीय अधिकृत संस्थांवर लस न दिल्याबद्दल अनेक आरोप केले होते. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आम्हाला कमीतकमी 50 लाख लस द्यावी, अशी विनंती केली होती. मात्र लस न मिळाल्याने झारखंड सरकारला 18 ते 44 वर्षे वयोगटातील लसीकरण मोहिम सुरुवात करता आली नाही.

तसेच गुजरातमध्ये कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात शनिवारी राज्यातील दहा जिल्ह्यात लसीकरण करण्यात आले आहेत. यानुसार गुजरातमध्ये 18 ते 44 वर्षे वयोगटातील 55,000 हून अधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली.  लसीकरण मोहिमेतंर्गत 9 राज्यात एकूण 80 हजार लस देण्यात आल्या होत्या. यातील सर्वाधिक 55,235 लस या गुजरातमध्ये देण्यात आले होते.

गुजरात सरकारने काल दिवसभरात 60,000 लोकांना लसी देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान 18 ते 44 वर्षे वयोगटातील लसीकरण मोहिम गुजरातमधील हॉटस्पाॉट ठरलेल्या दहा ठिकाणी देण्यात आली.

या जिल्ह्यांमध्ये अहमदाबाद, सूरत, वडोदरा, राजकोट, भावनगर, जामनगर, कच्छ, मेहसाणा, भरूच आणि गांधीनगर यांचा समावेश आहे.