औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार आशिष देशमुख आश्‍चर्यकारक अनोखा प्रचार !! 

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची निवडणूक येत्या १ डिसेंबर २०२० रोजी होत आहे. प्रचाराची रणधुमाळी जोरात चालू आहे. आशिष अशोक देशमुख यांनी विविध मार्गाने प्रचारयंत्रणा राबवली आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार आशिष देशमुख आश्‍चर्यकारक अनोखा प्रचार !! 
Independent candidate from Aurangabad graduate constituency Ashish Deshmukh's amazing unique campaign !!

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार आशिष देशमुख आश्‍चर्यकारक अनोखा प्रचार !!

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची निवडणूक येत्या १ डिसेंबर २०२० रोजी होत आहे. प्रचाराची रणधुमाळी जोरात चालू आहे. आशिष अशोक देशमुख यांनी विविध मार्गाने प्रचारयंत्रणा राबवली आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. पॉम्प्लेट, सोशल मिडीया फेसबुक या बरोबरच त्यांनी प्रचाराचा अनोखा फंडा वापरला आहे.

त्याची सध्या सर्वत्र जोरात चर्चा होतांना दिसत आहे. आशिष देशमुख यांनी शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर रोजी बीड शहरात चक्क घोड्यावर बसून पदवीधर मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना पहिल्या पसंतीचे मतदान करण्याचे आवाहन करत घोटाळेबाज उमेदवारांना धडा शिकवावा असे आवाहन त्यांनी केले.

बीड शहरातील विविध भागातील पदवीधर मंडळी, शासकीय कर्मचारी, युवक, युवती आणि महिला वर्ग व ज्येष्ठ नागरीकांना भावनिक साद घालून केले आहे. त्यांचे नाव मतपत्रिकेवर अ.क्र.१३ आशिष अशोक देशमुख या नावा समोरील रकान्यामध्ये पसंती क्र.१ नोंदवावा अशी विनंती व आवाहन त्यांनी मतदारांना केले.

बीड 

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणागत

___________