वाढत्या चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन...| सोशल मिडीयावर सावधान रहा! सतर्क रहा...चा इशारा...
घरफोड्या, चेन स्नॅचींग, ऑनलाईन फसवणूक यांसारख्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याने याबाबत पोलिसांच्या सतर्कतेबरोबरच नागरीकांनी देखील सतर्क राहण्याचे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

वाढत्या चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन...
सोशल मिडीयावर सावधान रहा! सतर्क रहा...चा इशारा...
कल्याण : घरफोड्या, चेन स्नॅचींग, ऑनलाईन फसवणूक यांसारख्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याने याबाबत पोलिसांच्या सतर्कतेबरोबरच नागरीकांनी देखील सतर्क राहण्याचे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.
महिलांनी बाजारात व बाहेर जातांना सोन्याचे दागीने घालणे टाळावे. चेन स्नॅचींगचे प्रकार टाळण्यासाठी पोलीस सतर्क आहेत. बाहेरगावी जातांना आपल्या मौल्यवान वस्तु, पैसे, दागीने सुरक्षीत ठिकाणी (उदा. बँकेच्या लॉकरमध्ये) ठेवावेत. मोबाईलवर बोलतांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता कोणालाही आपला OTP नंबर देऊ नये. नागरिकांनी अशा साध्या साध्या गोष्टी जरी अंमलात आणल्या तरी गुन्हेगारीला आळा बसू शकतो.
चोरीचे आणि फसवणूकीचे प्रकार टाळण्यासाठी पोलीस सतर्क आहेत. आपणाकडूनही सहकार्याची अपेक्षा असल्याचे आवाहन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधिक्षक स्मिता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक आर. डी. वंजारी आदीं पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांना एका पत्रकाद्वारे तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले आहे.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
___________