कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे - एन.आर.एच.एमची मागनी

साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कोरोना जागतिक महामारीत भारतात विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसेदिवस वाढत चालले असतांना त्यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागावर सुध्दा प्रचंड प्रमाणात ताण वाढला होता.

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे - एन.आर.एच.एमची मागनी
 
बीड :  साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कोरोना जागतिक महामारीत भारतात विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसेदिवस वाढत चालले असतांना त्यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागावर सुध्दा प्रचंड प्रमाणात ताण वाढला होता. अशा परिस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद बीड कडून आम्हाला कंत्राटी तात्पुरत्या स्वरुपात भरती करन घेतले, सर्व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता कोबीड 19 रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर होऊन कार्य केले.

त्यावेळेस कोरोना रुग्ण वाढत असताना गावातील लोकांनी व नातेवाईकांनी तुच्छ वागणूक दिली. अशा परिस्थितीत कर्तव्य बजावले.मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना आज देण्यात आले. कोरोना काळातील कंत्राटी पध्दतीची नियुक्ती संपुष्टात येत असून आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून आमच्या सर्वांना आरोग्य विभागातील रिक्त पदी नेमणूक देऊन कायमस्वरुती रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी  प्रमुख मागण्या
कोविड 19 कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत रुजू करणे.

अंशकालीन कर्मचारी घोषित करुन शासनाच्या विविध विभागातील जागा कोविड कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवणे. ज्याप्रकारे राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रम अंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून किमान 90 दिवस काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्राचा वापर बहुद्देशिय आरोग्य कर्मचारी 50% आरोग्य सेवेत यामध्ये केला जातो, त्याप्रमाणे कोविड 19 नियंत्रण कार्यक्रमातर्गत ज्यानी कोविड 19 कंत्राटी कर्मचारी म्हणून कमीत कमी 90 दिवस (3 महिने) असेल त्यांना शासनाने आरोग्य विभागातील सर्व पदासाठी 50 % आरक्षण दिले पाहिजे.

हंगामी फवारणी सारख्या केंद्रशासनाच्या तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विभागात जागा राखीव ठेवणे,जोपर्यंत आरोग्य विभागातील भरती निघत नाही तोपर्यंत येणाऱ्या एन. आर. एच. एम. मध्ये सर्व कर्मचारी यांचे शिक्षणाच्या आधारे रिक्त साऱ्या पदावर समायोजन करून घ्यावे या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यी . आरोग्याना मंत्र्यांना  निवेदन देण्यात आले यावेळी बीड जिल्ह्यातील कोवीड कक्षात काम करणाऱ्या परिचारिका, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

___________