भिवंडीत आगी लागण्याच्या घटना सुरूच,पुन्हा यंत्रमाग कारखान्याला लागली आग...
भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागली असून घटनेची मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्या साठी प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

भिवंडीत आगी लागण्याच्या घटना सुरूच,पुन्हा यंत्रमाग कारखान्याला लागली आग...
भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागली असून घटनेची मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्या साठी प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. तसेच आतापर्यंत या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. मात्र कपड्याचा साठा असल्याने मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.काही महिन्या पूर्वीच एका यंत्रमाग कारखान्याला, एका कपड्याच्या गोदामाला,एकां सायझिंग कंपनीला, आगी लागण्याच्या घटना घडल्या होत्या.
भिवंडीत आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.काही आगी या शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचे समोर आल्याने शॉर्ट सर्किट होईल अशी परिस्थिती टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरू आहे. यानंतरच आग लागण्याच्या मुख्य कारणाचा खुलासा होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या आधीही भिवंडीतील राहनाळ गावात बस स्थानकाजवळ असलेल्या दौलत कंपाऊंड येथे एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. या आगीत गोदामातील लाखो रुपयांचे धाग्यांचे कोम जळून खाक झाले.या गोदामात कापड बनवण्यासाठी लागणारे ताग्याच्या कोमचा (यार्न ) साठा मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता.सद्या या आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या.
त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यानंतर दोन तासात आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. संबंधित गोदामाच्या बाजूलाच थोड्या अंतरावर पेट्रोल पंप आहे. मात्र, वेळेत आग विझल्याने मोठा अनर्थ टळला.
भिवंडी
प्रतिनिधी - सत्यवान तरे
___________