पश्चिम रेल्वे ओबीसी एम्प्लाइज असोसिएशन कार्यालयाचे उद्घाटन...

रेल्वे ओबीसींच्या एम्प्लाइज असोसिएशन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन सफाळे पुर्व रेल्वे स्टेशन समोर 1 नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजता  पंडित बिल्डिंग येथे दुसऱ्या मजल्यावर करण्यात आले.

पश्चिम रेल्वे ओबीसी एम्प्लाइज असोसिएशन कार्यालयाचे उद्घाटन...
Inauguration of Western Railway OBC Employees Association Office...

पश्चिम रेल्वे ओबीसी एम्प्लाइज असोसिएशन कार्यालयाचे उद्घाटन...

   रेल्वे ओबीसींच्या एम्प्लाइज असोसिएशन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन सफाळे पुर्व रेल्वे स्टेशन समोर 1 नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजता  पंडित बिल्डिंग येथे दुसऱ्या मजल्यावर करण्यात आले. तसेच   या कार्यालयाचे अनुसरून म्हणून पाटील टेलर येथे  संपर्क कार्यालयाचे हि उद्घाटन करण्यात आले. या दोन्ही कार्यालयाचे उद्घाटन जयप्रकाश नारायण विद्यालय आगरवाडी येथील माजी मुख्याध्यापक  पि.टी.पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले असून प्रमुख पाहुणे म्हणून वृक्षमित्र प्रकाश काळे उपस्थित होते. या कार्यालयात रेल्वे  कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, सामाजिक कार्य ,धार्मिक कार्य ,शैक्षणिक कार्य, यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी रेल्वे ओबीसी एम्प्लाइज असोसिएशनचे अध्यक्ष भास्कर पाटील, वकील मोहिनी पाटील, सामाजिक कार्यकर्ते केशव पाटील, अशोक पाटील, अनंता पाटील रेल्वे सेवानिवृत्त  रमेश पाटील,बबन पाटील, संदीप पाटील, बबन भोईर, डॉ.शितळ वाजा, राज ट्रॅव्हलच्या संचालक हेमा पाटील,  उपस्थित होते.

पालघर

प्रतिनिधी - रविंद्र घरत

_______