स्वाती हनमघर यांच्या स्वेव स्पालॉनचे मोठ्या दिमाखात उद्घाटन...| स्वेव स्पालॉन ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज...

एका क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असतात. तुमची ज्ञानेंद्रिय सजग असतील तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात नवी छाप सोडू शकतात. यावर विश्वास ठेवून सौंदर्य क्षेत्रात गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत असलेल्या स्वाती हनमघर यांनी स्पालॉन सुरू करण्याचे ठरवले आहे. स्पा, सलॉन, ब्युटी स्टुडिओ आणि अकॅडमी यांचे एकत्रीकरण असलेली ही स्पालॉन संकल्पना आहे.

स्वाती हनमघर यांच्या स्वेव स्पालॉनचे मोठ्या दिमाखात उद्घाटन...| स्वेव स्पालॉन ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज...
Inauguration of Swati Hanamghar's Swave Spalon in a big way ... | Sve Spalon ready to serve customers ...
स्वाती हनमघर यांच्या स्वेव स्पालॉनचे मोठ्या दिमाखात उद्घाटन...| स्वेव स्पालॉन ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज...
स्वाती हनमघर यांच्या स्वेव स्पालॉनचे मोठ्या दिमाखात उद्घाटन...| स्वेव स्पालॉन ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज...
स्वाती हनमघर यांच्या स्वेव स्पालॉनचे मोठ्या दिमाखात उद्घाटन...| स्वेव स्पालॉन ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज...

स्वाती हनमघर यांच्या स्वेव स्पालॉनचे मोठ्या दिमाखात उद्घाटन...

स्वेव स्पालॉन ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज...

पुणे : एका क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असतात. तुमची ज्ञानेंद्रिय सजग असतील तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात नवी छाप सोडू शकतात. यावर विश्वास ठेवून सौंदर्य क्षेत्रात गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत असलेल्या स्वाती हनमघर यांनी स्पालॉन सुरू करण्याचे ठरवले आहे. स्पा, सलॉन, ब्युटी स्टुडिओ आणि अकॅडमी यांचे एकत्रीकरण असलेली ही स्पालॉन संकल्पना आहे. एकाच ठिकाणी अनेक सोयी उपलब्ध करून देणे, तसेच मानसिक आरोग्य आणि सौंदर्य यांची सांगड घालून ग्राहकांना उत्तम सुविधा देणे या स्पालॉनचे विशेष आकर्षण आहे. ही संकल्पना यूनिसेक्स (स्त्री आणि पुरुष दोघांकरिता) असून नवीन असल्यामुळे ग्राहकांना नक्कीच आकर्षित करेल अशी खात्री स्पालॉनच्या सर्वेसर्वा स्वाती हनमघर यांनी दिली. 

नवोदित संकल्पनेतून साकारलेल्या या स्वेव स्पालॉनचा उद्घाटन समारंभ  पार पडला. स्पालॉनची पहिली शाखा सिंहगड रस्ता येथील माणिकबाग येथे सुरू झाली.मा.स्वाती हनमघर यांचे सासुसासरे मा.कोंडीबा कृष्णा  हनमघर व सौ गऊबाई कोंडीबा हनमघर यांच्या हस्ते उदघाटन झाले.यावेळी मा.विकास दांगट (मा.नगरसेवक),मा.स्वाती पोकळे(पुणे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),मा. राम बांगड (रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट),मा.अर्चना पाटील(चाईल्ड कौन्सलर आणि संस्थापक उगम संस्था),मा.अनुजा शिंदे(मॉडेल),मा.रोहित शिंदे( मिस्टर ग्लॅम इंडिया युरासिया, बॉलिवुड मिस्टर इंडिया),मा.चेतना बिडवे( संस्थापक उगम आणि संकल्प इस्टिट्यूट),मा.अमर सोनवणे(इंटरनॅशनल पेजेन्ट डिरेक्टर),मा.उमा जग्यानी (इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट),मा.प्रणिता जगताप(सामाजिक कार्यकर्त्या),मा.सागर बोदगिरे(संपर्क प्रमुख -ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन),मा.पल्लवी तावरे (मेकअप आर्टिस्ट,इंप्रेशन ब्युटी अँड सलोन),मा.अनिता जाधव (सामाजिक कार्यकर्त्या),मा.सविता झालटे(सामाजिक कार्यकर्त्या),मा.योगिता काकडे(उद्योजिका),मा.शीतल शर्मा(उद्योजिका),मा.सुमती शेडे, मा.सीताराम शेडे,मा.स्मिता शिंगाडे(संचालक नाथ प्रा लि),मा.नितीन शिंगाडे(नाथ प्रा ली),मा.शीतल शेडे(संचालिका शीतल इंटेरिअर डिझाइनर)मा.तेजस हनमघर(संचालक निखारा बिर्याणी)अशा वेगवेळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

स्वेव स्पालॉनविषयी बोलताना स्वाती म्हणाल्या, या स्पालॉनच्या माध्यमातून खाजगी प्रशिक्षण तर देण्यात येईल. तसेच गरजू आणि ग्रामीण मुलामुलींना सौंदर्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय सदस्यत्व, पॅकेजेस, व्हाउचर, आकर्षक ऑफर्सही असणार आहे. तसेच भविष्यात विविध ठिकाणी स्पालॉनच्या शाखा काढणार असून फ्रांचाईजी उपलब्ध करून देणार आहोत.

स्वाती म्हणाल्या, गेली पंधरा वर्षे मी क्षेत्रात कार्यरत आहे व माझे स्वप्न आज साकार होत असून त्याचा मला खूप आनंद होत आहे या उदघाटन प्रसंगी सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि मित्रपरिवार मला शुभेच्छा देण्यासाठी आले त्यांचे आभार मी  व्यक्त करत आहे.जसे की हिऱ्यामध्ये पैलू असतात तसेच मला सर्वजण या कार्यक्रम निमित्ताने लाभले आहेत.या क्षेत्रात प्रवेश केल्यापासून काहीतरी वेगळे करण्याचे स्वप्न मी पाहत होते. सौंदर्य क्षेत्रातील अनुभव, अवॉर्ड्स यामुळे स्पालॉनच्या संकल्पनेकडे मी अधिक आत्मविश्वासाने पाहू लागले. हे स्वप्न साकारताना एक वेगळाच आनंद होत आहे. कारण इथपर्यंतचा प्रवास जास्त खडतर होता. आताच्या घडीला स्वतंत्र स्त्री म्हणून आयुष्याकडे बघणे खूप महत्त्वाचे आहे. तुमचं काम तुम्हाला प्रतिष्ठा आणि आदर देते. त्यामुळे कामातून स्वतःला सिद्ध करा आणि स्वतःची ओळख मिळवण्यासाठी तुमच्या छंदाचे रूपांतर व्यवसायात करा.

जामखेड

प्रतिनिधी - प्रभाकर तिडके
___________