वाडा तालुक्यातील कोने येथे क्रीडा संकुलाचे उद्घाटन...| वाडा तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून व्यक्त केला निषेध...
वाडा तालुक्यातील कोने - दुपारे पाडा गावच्या हद्दीत १६ एकर जागेत तालुका क्रिडांगणाचे संकुल उभारण्याचे भूमीपूजन दि.30 ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
वाडा तालुक्यातील कोने येथे क्रीडा संकुलाचे उद्घाटन...
वाडा तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून व्यक्त केला निषेध...
वाडा तालुक्यातील कोने - दुपारे पाडा गावच्या हद्दीत १६ एकर जागेत तालुका क्रिडांगणाचे संकुल उभारण्याचे भूमीपूजन दि.30 ऑक्टोबर रोजी करण्यात आले. या क्रीडांगणांचे भूमीपूजन आमदार दौलत दरोडा,आमदार सुनील भुसारा व वाडा तहसीलदार डॉ.उध्दव कदम यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.
या संकुलासाठी १ कोटीचा निधी मंजूर असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे ७४ लाखांचा निधी वर्षभरापूर्वी वर्ग करण्यात आला होता. परंतु एका वर्षापासून निधी धूळ खात पडला असल्याने स्थानिक तरुणांनी संताप व्यक्त केला होता. सदर क्रीडासंकुल उभे राहणार असलेल्या १६ एकर जागेत येथील स्थानिक नागरिकानीं अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी भूमीपूजना पूर्वी आमदार दौलत दरोडा व वाडा तहसीलदार उद्धव कदम यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली.
दरम्यान भूमीपूजन होत असताना वाडा तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.कारण गेल्या अनेक वर्षांपासून क्रीडा संकुल उभे रहावे यासाठी मनसे आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करत होती. परंतु भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला मनसे च्या नावाचा विसर पडला असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.
वाडा
प्रतिनिधी : जयेश घोडविंदे
___________