धुरापाडा येथे शहीद भगतसिंग खुले वाचनालयाचे उदघाटन...
सुरगाणा तालुक्यातील धुरापाडा गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुरापाडा आणि मावळा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांचे सौजन्याने शहीद भगतसिंग खुले वाचनालय सुरू करण्यात आले.
धुरापाडा येथे शहीद भगतसिंग खुले वाचनालयाचे उदघाटन
सुरगाणा - तालुक्यातील धुरापाडा गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुरापाडा आणि मावळा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांचे सौजन्याने शहीद भगतसिंग खुले वाचनालय सुरू करण्यात आले. सध्या शाळा जरी बंद असल्या तरी धुरापाडा गावात सुरक्षेचे सर्व नियमांचे पालन करून मुलांचे शिक्षण सुरू आहे. याच उपक्रमाची दखल घेऊन पंचायत समिती सुरगाणा यांनी सुरू केलेल्या डोनेट अ बुक या उपक्रम अंतर्गत नुकतेच मावळा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांचेकडून शाळेला 125 पुस्तके भेट देण्यात आली. शाळेतर्फे 250 पुस्तके भेट देण्यात आली.तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय चव्हाण यांनी 21 पुस्तके भेट दिली. त्याचबरोबर जिल्हा परिषद नाशिक च्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड मॅडम यांच्या प्रेरणेतून जिल्हा परिषद शाळेतील गरीब विद्यार्थ्यांचे लॉक डाऊन च्या कालावधीमध्ये शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या हेतूने डोनेट डिवाइस हा उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमाअंतर्गत दानशूर व्यक्तींकडून समाजसेवी संस्थांकडून लोकसहभागातून स्मार्ट टीव्ही, जुना मोबाईल, रेडिओ लॅपटॉप, जुने टॅब किंवा इतर ऑनलाईन शिक्षणाची साधने हे दान करण्यास सूचित केलेला आहे.
त्याप्रमाणेधुरापाडा गावातील पालकांनी मोलमजुरी करून आपल्या मुलांनी सुद्धा ऑनलाइन शिक्षण प्रणाली मध्ये कुठेही कमी पडू नये म्हणून 7000/- रुपये किमतीचा नवीन टॅब शाळेला भेट दिला. एक वेळ पोटापाण्यासाठी भटकंती करणार्या आदिवासी भागातील पालकांनी शाळेला टॅब भेट देणे ही कदाचित नाशिक जिल्ह्यातील पाहिलीच घटना असेल असे प्रतिपादन काशिशेंबा शाळेचे मुख्याध्यापक भावराव कोरडे यांनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुरापाडा यांनी सुरू केलेल्या.
www.zpschooldhurapada.blogspot.com या शाळेच्या वेबसाइटचे उदघाटन मा. प्रमुख पाहुणे हरिश्चंद्र गांगोडे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन संजय चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक, कांतीलाल कवर, नामदेव गारे, स्वयंसेवक अनिल चौधरी, अजय गायकवाड, सरपंच मोनिका पवार, उपसरपंच पांडुरंग गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवसु गावित, उपाध्यक्ष सुरेश ओलंबे, नितीन पवार, मिथुन चौधरी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला धुरापाडा केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व कमलाकर गावीत, जयवंत अहिरे शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सुरगाणा
प्रतिनिधी - अशोक भोये
____________