आधारभूत खरेदी केंद्राचे आमदार दौलत दरोडा व आमदार सुनिल भुसारा यांच्या हस्ते उद्घाटन...

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या बहुप्रतिक्षित आधारभूत खरेदी केंद्राचे उद्घाटन शहापूर विधानसभेचे आमदार तथा अनुसुचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख दौलत दरोडा व विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल भुसारा यांच्या हस्ते वाडा तालुक्यातील परळी या दुर्गम क्षेत्रात करण्यात आले.

आधारभूत खरेदी केंद्राचे आमदार दौलत दरोडा व आमदार सुनिल भुसारा यांच्या हस्ते उद्घाटन...
Inauguration of Basic Shopping Center by MLA Daulat Daroda and MLA Sunil Bhusara ...

आधारभूत खरेदी केंद्राचे आमदार दौलत दरोडा व आमदार सुनिल भुसारा यांच्या हस्ते उद्घाटन...

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या बहुप्रतिक्षित आधारभूत खरेदी केंद्राचे उद्घाटन शहापूर विधानसभेचे आमदार तथा अनुसुचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख दौलत दरोडा व विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल भुसारा यांच्या हस्ते वाडा तालुक्यातील परळी या दुर्गम क्षेत्रात करण्यात आले.

भातउत्पादक शेतकऱ्यांच्या भाताला आधारभूत किंमत किंबहुना हमीभाव मिळावा यासाठी शासनाच्या वतीने संपूर्ण कोकणात अशी आधारभूत केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ आमदार तथा अनुसुचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख दौलत दरोडा यांच्या पुढाकाराने परळी येथे करण्यात आला. तसेच तालुक्यातील कळंभे, खैरे-आंबिवली, पोशेरी, गारगांव, खानिवली, गोऱ्हे, गालतरे याठिकाणीही वाडा तालुक्यात ही केंद्र सुरु करण्यात आल्याची घोषणा आमदार दरोडा यांनी केली. 

यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना विक्रमगड विधानसभा संपर्कप्रमुख प्रल्हाद कदम, पालघर जिल्हा सरचिटणीस अशोक गव्हाळे, तालुका अध्यक्ष रोहिदास पाटील, पालघर जि. प. चे गटनेते नरेश आकरे, जि. प. बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी, जि. प. सदस्या रोहिणी शेलार, जेष्ठ नेते हरिभाऊ पाटील, माधव पाटील, भगवान भोईर वाडा शहर अध्यक्ष अमिन सेंदू, पंचायत समिती उपसभापती जगदीश पाटील, पंचायत समिती सदस्य रघुनाथ माळी, पूनम पथवा, माजी सभापती मृणालिनी नडगे, नगरसेविका सुचिता पाटील, युवक अध्यक्ष राहुल वेखंडे, इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक सदानंद राजुरे यांनी केले तर सूत्रसंचालन सामाजिक न्याय विभागाचे पालघर जिल्हा अध्यक्ष तारक जाधव यांनी केले.

वाडा

प्रतिनिधी : जयेश घोडविंदे

_________