कोजागिरीच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाडा तालुका " जनसंपर्क " कार्यालयाचे उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव ह्यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन पार पडले तसेच सन्मा.राजसाहेब ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काल दी. ३०/१०/२०२० रोजी तालुक्यातील शेकडो महिला, तसेच तरुण, तरुणींनी अविनाश जाधव ह्यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.
कोजागिरीच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाडा तालुका " जनसंपर्क " कार्यालयाचे उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव ह्यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन पार पडले तसेच सन्मा. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काल दी. ३०/१०/२०२० रोजी तालुक्यातील शेकडो महिला, तसेच तरुण, तरुणींनी अविनाश जाधव ह्यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. तसेच वाडा तालुक्यातील रिक्त असलेल्या सर्व पदांची नियुक्ती पत्र देऊन नियुक्त्या करण्यात आल्या.
भविष्यात पालघर जिल्ह्यात वाडा तालुका हा मनसेचा बाले किल्ला बनवून दाखवू असे आश्वासन बोलताना तालुका अध्यक्ष कांतीकुमार ठाकरे ह्यांनी मान्यवरांना दिले त्यावेळी मनसेचे संयमी व्यक्तीमत्व, झुंजार, लढवय्ये ठाणे / पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मानिय अविनाश जाधव भिवंडी लोकसभेचे जिल्हा अध्यक्ष शैलेश बिडवी, कामगार सेना उपाध्यक्ष संदीप राणे विद्यार्थी सेनेचे जिल्हा ठाणे ग्रा. अध्यक्ष संतोष साळवी, पालघर जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी सेना भावेश चुरी, महिला सेना जिल्हा अध्यक्षा कामिनी खंडागळे, उप जिल्हा अध्यक्ष महिला सेना शुभांगी गोवारी, उप जिल्हा अध्यक्ष संदेश पडवळे, सचिव सतीश जाधवसह शेकडो मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
वाडा
प्रतिनिधि : रविंद्र घरत
___________