विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व सुरक्षेच्या संदर्भात कांदिवली येथे अमरण उपोषण...
दामू नगर कांदिवली पूर्व मुंबई लास्ट स्टॉप याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ५ वर्षापूर्वी पुतळा बसवलेला आहे.या पुतळ्याचे अनावरण तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले होते परंतु सध्या या पुतळ्याच्या आजूबाजूला अतिक्रमण व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे या ठिकाणी अतिक्रमण वाढले आहे तसेच सदर पुतळा चौथरा तूटला आहे.

सदर पुतळ्याच्या चौथ-याचे सुशोभिकरण करावे तसेच याठिकाणी संरक्षण देण्यात यावे यासाठी पाच वर्षापासून लोकप्रतिनिधींना वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कुठलाही काम झालेले नाही याच गोष्टीसाठी येथील विविध सामाजिक कार्यकर्ते दिनांक २ डिसेंबर २०२० पासून आमरण उपोषण करणार आहेत.
यामध्ये बौद्धजन उत्कर्ष विकास मंडळाचे अध्यक्ष राम हरी तांबारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मागाठाणे विधानसभा महासचिव पत्रकार संजय बोर्डे विलास रोहिमल, रिपाई मुंबई उपाध्यक्ष पत्रकार संजय सकपाळ, रोहित होले सुखदेव कांबळे पंडित कोकणे सिकंदर इनामदार उपोषण करणार आहेत. तसेच विविध सामाजिक संघटनांनी व राजकीय पक्षांनी या उपोषणास पाठिंबा दिला आहे.
मुंबई
प्रतिनिधी - संजय बोर्डे
___________