लवंग खा..आणि या ढीगभर आजारांनां कायमचं दूर पळवा...!!

लवंग नक्कीच आकाराने लहान  आहे मात्र लवंग खाण्याचे फायदे चमत्कारी आहेत. अनादी काळापासून लवंगेचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्येही करण्यात आला आहे. यामध्ये असे औषधीय गुण आहेत जे शरीरात असलेल्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. खरं तर याचा जास्तीत जास्त उपयोग हा जेवणामध्ये आणि सर्दी अथवा खोकला झाला असल्यास, करण्यात येतो. पण त्याव्यतिरिक्तही लवंगेचे अनेक फायदे आहेत.

लवंग खा..आणि या ढीगभर आजारांनां कायमचं दूर पळवा...!!
Some tips about the how to stay away from diseases..!! | theganimikava

लवंग फायदे नक्की काय आहेत ते आपण लेखातून जाणून घेणार आहोत. कदाचित याबाबत बऱ्याच जणांना  माहीत नाही. त्यामुळे या गोष्टीची अधिक माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लवंग औषधीय असून लवंग खाण्याचे फायदे नक्की काय आहेत ते आपण जाणून घेऊया. 

लवंगामध्ये असलेले पोषक तत्वे :

लवंगमधून शरीराला आवश्यक असणारी अनेक पोषक तत्व मिळतात. यामध्ये पाणी, एनर्जी, फायबर, कार्बोहायड्रेट, ग्लुकोज, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम,  फॉस्फोरस, पोटॅशियम, सोडियम, जिंक, कॉपर, मँगनीज ही मिनरल्स तर विटामिन सी, विटामिन बी, थियामिन बी, कोलीन, बीटेन, विटामिन ई, विटामिन के या सगळ्याचा समावेश आहे. 

 • त्यामुळे लवंग ही शरीराला अतिशय उपयुक्त ठरते. मुळात तुम्हाला बऱ्याच आजारांपासून दूर ठेवण्यासाठी लवंगाचा उपयोग करून घेता येतो. 
 • यातील पोषक तत्वे ही शरीराला अनेक आजारांशी लढा देण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे नियमित आपल्या जेवणातही लवंगेचा उपयोग करण्यात येतो. तसंच काही आजारांवर लवंग हा रामबाण इलाज आहे. विशेषतः दातदुखीसारख्या आजारांवर.

या पोषक तत्वामुळे लवंग खाण्याचे फायदे काय होतात ते आपण पुढे पाहूया. 

लवंग खाण्याचे आरोग्यासाठी हे आहेत फायदे....

1) तोंडाची काळजी :

 • लवंगेच्या पाकळ्या या ओरल मायक्रो ऑर्गेनिजम तोंडात निर्माण होणारे सूक्ष्म जीव 70 टक्के कमी करतात.
 • यामुळे बऱ्याच टूथपेस्टमध्ये तुम्हाला लवंग वापरण्यात  आलेली दिसून येते.
 • तुळस, टी ट्री ऑईलसह जर तुम्ही लवंगेचा उपयोग करून तुम्ही घरच्या घरी माऊथ वॉश तयार केलं तर याचा तुम्हाला खूपच फायदा होतो.
 • मुळात दातदुखीवरील हा रामबाण  इलाज आहे. तुम्हाला दातदुखीपासून दूर राहायचं असेल आणि श्वासाची दुर्गंधी कमी करायची असेल तर तुम्ही दिवसातून एक तरी लवंग खायला हवी.  
 • यामुळे तुमच्या दातील किटाणू मरण्यास मदत मिळते. लवंगेपासून तयार करण्यात येणाऱ्या तेलानेही फायदा मिळतो. तसंच हिरड्यांवरील इन्फेक्शन कमी करण्यास याची मदत मिळते.
 • लवंगमध्ये युजेनॉल नावाचे असणारे तत्व दातांमधील दुखणे कमी करण्यास फायदेशीर ठरते. तसंच प्लाक आणि कॅरिजपासूनही लवंग वाचवण्यास मदत करते. 

2) सर्दी-खोकल्यावर घरगुती उपाय :

 • लवंगेतील गुण हे सर्दी आणि खोकल्यावरही उपायकारक आहेत.
 • यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी प्रभाव असल्याने सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. वास्तविक एक्सपक्टोरेंटप्रमाणे लवंग काम करते जे आतील बरगड्यांपासून तोंडापर्यंत श्वसन तंत्र स्वच्छ करण्याचे काम करते.
 •  त्यामुळे  कफ आणि सर्दी झाल्यास, लवंग घालून काढा तयार करा आणि तो प्या.
 • यामुळे लवकर सुटका मिळते. ब्लॅक टी मध्ये एक लवंग टाकून याचे सेवन करा. यामुळे सर्दी आणि खोकला बरा होतो.

3) मधुमेहाशी लढा :

 • मधुमेह नियंत्रित करण्यासाठी लवंगेचा वापर करता येतो.
 • मधुमेह ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तात साखरेचे प्रमाण अधिक असते.
 • रक्तातील ग्लुकोज कमी करून लवंग मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते.
 • एका शोधानुसार, लवंगमध्ये अँटिहायपरग्लायसेमिक, हायपोलिपिडेमिक आणि हेपेटोप्रोटेक्टिव्ह गुण असतात जे
 • मधुमेहाचीसमस्या कमी करण्यासह लिपिडमध्ये सुधारणा आणण्याचे आणि यकृत वाचविण्याचे काम करतात.

लवंगेसह त्याचे तेलही ग्लुकोज कमी करून लिपीड प्रोफाईल सुधारण्याचे काम करते आणि किडनीसंबंधी काही समस्या असल्यास, मधुमेहाच्या रुग्णांना वाचविण्याचे काम करते.

 4) पचनक्रियेत होते मदत :

 • लवंग शरीरातील एंजाइम्सना उत्तेजित करून पचनक्रिया बूस्ट करण्याचे काम करते.
 • याचे सेवन आतड्यात होणाऱ्या जळजळीचा स्तर कमी करून अपचनाची समस्या कमी करण्याचे काम करते.
 • पोटफुगणे, गॅस होणे, अपचन, मळमळ, डायरिया आणि उलटी होण्यासारख्या त्रासांपासून सुटका देण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर आहे.
 • याशिवाय लवंग आणि त्याचे तेल पेप्टिक अल्सरच्या लक्षणांनाही कमी करते.
 • ज्यांना अपचानाची समस्या आहे त्यांना लवंगेत एक चमचा मध घालून रात्री झोपण्यापूर्वी खाण्याचा सल्ला देण्यात येतो. 

5) वजन कमी करण्यासाठी फायदेशीर :

 • लवंगच्या मदतीने तुम्ही वजनही कमी करू शकता.
 • एका रिसर्चनुसार लवंगेत अँटिओबेसिटी प्रभाव असतो. त्यामुळे चरबी नियंत्रणात ठेवण्यास याची मदत मिळते.
 • एनसीबीआय(National Center for Biotechnology Information) च्य वेबसाईटवर असलेल्या एका शोधानुसार, चरबीयुक्त पदार्थ सेवन करण्याने जी जाडी वाढते ती कमी करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते.
 • यामध्येअसणारे अँटिओबेसिटी गुण वजन नियंत्रित करण्यास मदत करते. घरगुती उपाय करण्यासह वजन कमी करण्यासाठी योग आणि व्यायाम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.एक कप गरम पाण्यात पाव चमचा लवंग पावडर घालून सकाळी आणि रात्री प्यायल्यास, वजन कमी करण्यास मदत मिळते.

6) डोके व दातांमध्ये वेदना :

 • पूर्वीपासून डोकेदुखीवर उपाय म्हणून लवंग फायदेशीर ठरते.  
 • लवंगेमध्ये एनाल्जेसिक गुण असतात,  जे दात आणि डोकेदुखीच्या समस्येपासून सुटका मिळवून देतात.
 • त्याशिवायलवंगेचे तेलही दात आणि डोकेदुखीसाठी उपयुक्त ठरते.
 • लवंगेचे तेल दाताला लावल्यास दातदुखी आणि या तेलाचा वास घेतल्यास, डोकेदुखी कमी होते. 

7) लिव्हर साठी फायदेशीर :

 • लवंग फायदा हा लिव्हरसाठीही होतो.
 • एका अभ्यासानुसार, पॅरासिटामोलमुळे होणारा लिव्हरचा त्रास कमी करण्यसाठी लवंगेचा वापर करता येतो हे सिद्ध झाले आहे. हे सायटोप्लज्मिक एंजाइम्सची पातळी कमी करून लिव्हरला होणारा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते. 

8) हृद्यासाठीही फायदेशीर :

 • पोटॅशियम, सोडियम, जिंक, कॉपर, मँगनीज ही मिनरल्स लवंगेत असतात.
 • लवंगमध्ये पोटॅशियम असल्याने हार्ट रेट आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे काम लवंग करते.
 • त्यामुळे याने रक्तदाब वाढला जात नाही तर अगदी नियंत्रणात राहतो. त
 • नैसर्गिक रित्या रक्त पातळ करण्यासाठीही याचा वापर होतो.

लवंगाचा वापर कसा करावा??

 • फ्लेवरिंग एजंट स्वरूपात याचा वापर भारतीय मसाला, लोणचं आणि सॉसमध्ये  करता येतो.
 • लवंग पाण्यात उकळून याचे पाणी माऊथवॉश म्हणून वापरू शकता.
 • लवंगेच्या तेलाचे काही थेंब घेऊन कपाळावर मसाज केल्यास तणावमुक्त राहू शकता. घरगुती उपाय म्हणून याचा वापर करू शकता.
 • हिरड्यांमध्ये दुखत असेल आणि सूज आली असेल तर लवंगेच्या तेलाचे काही थेंब त्याठिकाणी लावा. हळूहळू मसाज करा.
 • ब्लॅक टी मध्ये एक लवंग टाकून याचे सेवन करा. यामुळे सर्दी आणि खोकला बरा होतो.
 • दात दुखत असल्यास, दाताखाली लवंग ठेवा. थोड्यावेळात दातदुखी कमी होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा... धन्यवाद...

टीप - ह्या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सर्वसाधारण  माहिती वर आधारित आहे. The Ganimikava ह्याची पुष्टी करत नाही. ह्याची अंमलबजावणी करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

______

Also see : केस गळती थांबवणे ते स्मरणशक्ती वाढवणे : जास्वंद फुलाचे हे थक्क करणारे फायदे...!! 

https://www.theganimikava.com/Know-the-benefits-of-Hibiscus-Sabdariffa