असा करावा वायू प्रदूषणा पासून बचाव...!!

वायुप्रदूषण म्हणजे वातावरणाचे मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचा अविभाज्य भाग असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळून जातात तेव्हा वायुप्रदूषण झाल्याचे समजते. फक्त मानवी आरोग्यास हानिकारक असलेले वातावरणातील घटक वायुप्रदूषणास जबाबदार आहेत, असे पूर्वी समजले जात असे. कालांतराने वायुप्रदूषणाची व्याख्या इतर प्राण्यांना, पक्ष्यांना व वनस्पतींना हानिकारक असलेल्या घटकांनाही लागू झाली. सध्याच्या युगात हवामान बदलास जबाबदार असणारे घटक हे देखील वायुप्रदूषणाला कारणीभूत असल्याचे मानले जाते.

असा करावा वायू प्रदूषणा पासून बचाव...!!
See some tips about how to prevent air pollution...| theganimikava

सध्याच्या विज्ञान युगामध्ये मानवाने कितीही शोध संशोधन केली तरीही अशी एखादी आपत्ती अख्ख्या जगावर येते की, त्यापासून विज्ञान किंवा कोणतीच दैवी शक्ती देखील बचाव करू शकत नाही. एवढी भयानक आपत्ती कधीही येऊ शकते आणि येत असते.

 • तरीसुद्धा प्रकर्षाने जाणवते की हे सगळं होत असेल तरीही वायुप्रदूषण हे देखील तितकीच एक गंभीर समस्या बनलेली दिसते. आणि म्हणूनच वायूत प्रदूषणापासून देखील आपल्याला बचाव करणे खूप गरजेचा आहे. आता वायुप्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर कसा प्रभाव पडू शकतो हे आपल्याला चांगलंच माहिती आहे.
 • कारण प्रदूषण म्हटलं ती धूळ आणि प्रदूषण यामुळे फुपुसाचे आरोग्यावर होणारा परिणाम..! त्यामुळे शरीराची आजारांशी लढण्याची ताकद खूप कमी होते. त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये आणि आहारात योग्य तो बदल करून सुधारणा करून आपण स्वतः श्वसन प्रक्रियेला चांगलं बनवू शकतो. त्यावर असणारे काही ठळक उपाय खालीलप्रमाणे :

फळांचा उपयोग :

आपलं फुफ्फुसाचा आरोग्य चांगले राखण्यासाठी इतर जंकफूड खाणे ऐवजी फळांचं सेवन करणे गरजेचे आहे.

 • जवळपास ३१ देशांमध्ये झालेल्या संशोधनात फळांचा नियमित सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये श्वसनाशी संबंधित आजार इतरांच्या तुलनेत कमी प्रमाणात होताना आढळले.
 • एवढच नाही तर आठवड्यातून तीन-चार फळांचे सेवन करणार्यांमध्ये दम्याची लक्षणे कमी होताना दिसतात.
 • २००४ मध्ये झालेल्या अध्याय नुसार आठवड्यातून पाच पेक्षा अधिक दिवस सफरचंद खाण्याने फुप्फुसांची क्षमता वाढते, श्वास घेण्याशी संबंधित असलेला त्रास या लोकांमध्ये कमी जाणवतो.
 • सफरचंदात क्वेसेटिन आइ खेलिन नावाची फ्लेवेनाॅएड असतात. जी श्वासनलिकाना उघडतात.

क जीवनसत्वाचा महत्त्व :

लंडनमधील इंपिरियल कॉलेजमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार अस्थमा आणि फुफ्फुसांच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी जर पुरेशा प्रमाणात क जीवनसत्त्व जेवण केलं नाही तर त्यांना दवाखान्यात दाखल करण्याची शक्यता वाढते.

 • आंबट फळं आणि पालेभाज्यांमध्ये जीवनसत्व क भरपूर प्रमाणात आढळते.
 • जो वायू प्रदूषणाचा परिणाम कमी करतो द्राक्ष आवळा अननस विषारी घटकांना बाहेर काढतात.
 • आल्याच्याचहाचा देखील तितकंच महत्त्व आहे. आल्याचा उपयोग आपण पूर्व पर औषध म्हणून करत आलो आहोत.
 • दिवसाची सुरुवातच आपल्याला चहा ने करायची तर त्यावेळेला आल्याचे चहाने सुरुवात करा.
 • संध्याकाळी देखील परत एकदा आल्याचा चहा प्या त्यामुळे स्वास नलिकेतून प्रदूषक घटक बाहेर निघून जातील. तसंच घरातून बाहेर पडताच जिभेखाली लवंग ठेवणं हे देखील फायदेशीर ठरत असतं.

ब्रोकोली :

ब्रोकोलीचे देखील आपल्या जीवनात खूप महत्त्व जाणवतं आणि खाण्याने आरोग्य चांगलं राहतं.

 • एका संशोधनानुसार वनस्पतीमध्ये आढळणारा सल्फोराफेन नावाचा घटक ब्रोकोली मध्ये भरपूर प्रमाणात असतो, जो शरीरातील बेंझीन नावाचा घटक बाहेर काढण्यास मदत करतो.
 • बेंझीन हा घटक कॅन्सर कारक आहे आणि फुफ्फुसचे नुकसान करणारा आहे.
 • ब्रोकोली स्प्राऊट्स आणि ब्रोकोलीचे सूप पिण्याने विषारी घटक बाहेर येतात.

लसूण :

लसूण देखील खूप उपयोगी आहे आठवड्यातून दोन वेळा लसणाच्या पाकळ्या कच्चा खाण्याने फुप्फुसाच्या कर्करोगाची जोखीम बऱ्याच अंशी कमी होते.

जुलै २०१३ मध्ये प्रकाशित झालेल्या कॅन्सर प्रिव्हेन्शन जनरल च्या अहवालानुसार कच्चा लसूण खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

ह्या आणि अशाच काही टिप्स जर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये अमलात आणल्या तर आपल्या आरोग्य ला एक संरक्षण कवच मिळू शकतो, आणि त्यामुळे संसर्गजन्य रोग, आजार यांच्या विषाणूपासून आपण आपला बचाव करू शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणिआपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

... धन्यवाद...

टीप - ह्या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सर्वसाधारण  माहिती वर आधारित आहे. The Ganimikava ह्याची पृष्टि करत नाही. ह्याची अंमलबजावणी करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा.