कोरेगाव भीमा प्रकरण : वरवरा राव हे रुग्णालयात दाखल....

जेष्ठ कवी वरवरा राव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोरेगाव भीमा प्रकरण : वरवरा राव हे रुग्णालयात दाखल....

कोरेगाव भीमा प्रकरण : वरवरा राव यांना रुग्णालयात केले दाखल....

कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले जेष्ठ कवी वरवरा राव यांना काल रात्री मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना चक्‍कर येत असल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. त्यांच्या काही चाचण्या केल्या जाणार असल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले आहे.

वरवरा राव यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना अत्यावश्यक सोयी असलेल्या रुग्णालयात भरती करण्यात यावे, अशी मागणी राव यांच्या कुटुंबियांनी केंद्र तसेच राज्य सरकारकडे केली आहे.

राव यांच्या पत्नी पी. हेमलता यांनी म्हटले आहे की, वरवरा राव गेल्या दोन महिन्यांपासून आजारी असून, त्यांच्यावर कारागृहातील रुग्णालयातच उपचार करण्यात येत आहेत.
कारागृहात करण्यात येणारा उपचार पुरेसा नसून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. राव यांना साधं बोलतासुद्धा येत नाही. कारागृहात आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना चांगल्या रुग्णालयात दाखल करण्यात यावे.