कल्याण पश्चिमेतील उच्चभ्रू इमारतीमधील घराला भीषण आग...
कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीमधील घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहित्याची जळून राख रांगोळी झाली आहे.

कल्याण पश्चिमेतील उच्चभ्रू इमारतीमधील घराला भीषण आग...
कल्याण : कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीमधील घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहित्याची जळून राख रांगोळी झाली आहे. मात्र वेळेतच अग्निमशन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे पुढील होणारी मोठी दुर्घटना टळली आहे.
कल्याण पश्चिम भागात गोदरेज हिल परिसरात टेकडीवर कॅसोरीन नावाची इमार आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये ही भीषण आग लागली. या फ्लॅट मधील वातानुकूलित यंत्रणात बिघाड झाल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे आग लागली त्यावेळी घरातील काही सदस्य घरामध्येच होते. या आगीने काही वेळातच भीषणस्वरुप धारण केल्याने संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले.
ही आग एवढी मोठी होती कि, गॅलरीमधून शेजाऱ्या घरांनाही आगीची झळ पोहचली, मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आली आणि पुढील होणारी मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या आगीत घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून राख रांगोळी झाली. सुदैवाने वेळेतच घरातील उपस्थित सदस्य घरांबाहेर पडल्याने जीवितहानी टळली.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
___________