पालघरमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी...

पालघर जिल्ह्यात काही ठिकणी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लावली.

पालघरमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी...

पालघर जिल्ह्यात काही ठिकणी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लावली, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून पालघर तालुक्यात पालघरसह माहीम, सातपाटी, केळवे भागात पाऊस सुरू, या अवकाळी पावसामुळे येथे असलेले वीट उत्पादक व गवत-पावळी व्यापारी चिंतेत, मोठ्याप्रमाणात नुकसान, येत्या तीन तासात पावसाचा इशारा हवामान खात्याचा अंदाज...

हवामान अंदाज दि :10/12/2020

भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात 11 ते 17 डिसेंबर, 2020 दरम्यान तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर तीन आठवडे हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

त्याबरोबर पुढील चार आठवडे कमाल व किमान  तापमान सरासरीपेक्षा कमी राहील असा अंदाज देण्यात आला आहे.

जिल्हा कृषि हवामान केंद्र, ग्रामीण कृषि मौसम सेवा, कृषि विज्ञान केंद्र, पालघर

पालघर 

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

___________