धनगर समाजाचे नेते दत्ता वाकसे व सदानंद खिंडरे यांच्या 15 वर्षाच्या परिश्रमात यश...| पाडळसिंगी ते लोखंडी सावरगाव 84 किलोमीटर राज्य महामार्गाला 425 कोटीचा निधी मंजूर...

तीन मतदार संघाच्या माध्यमातून जाणारा राज्य रस्ता क्रमांक 232 पाडळसिंगी ते लोखंडी सावरगाव या राज्य  रस्त्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून  425 कोटी रुपये मंजूर झाले.

धनगर समाजाचे नेते दत्ता वाकसे व सदानंद खिंडरे यांच्या 15 वर्षाच्या परिश्रमात यश...| पाडळसिंगी ते लोखंडी सावरगाव 84 किलोमीटर राज्य महामार्गाला 425 कोटीचा निधी मंजूर...
Success in the 15 years of hard work of Dhangar Samaj leaders Datta Wakse and Sadanand Khindre ... | 425 crore sanctioned for 84 km state highway from Padalsinghi to Lokhandi Savargaon ...

धनगर समाजाचे नेते दत्ता वाकसे व सदानंद खिंडरे यांच्या 15 वर्षाच्या परिश्रमात यश...

पाडळसिंगी ते लोखंडी सावरगाव 84 किलोमीटर राज्य महामार्गाला 425 कोटीचा निधी मंजूर...

तीन मतदार संघाच्या माध्यमातून जाणारा राज्य रस्ता क्रमांक 232 पाडळसिंगी ते लोखंडी सावरगाव या राज्य  रस्त्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून  425 कोटी रुपये मंजूर झाले. असून या परिश्रमाला गेवराई चे आमदार लक्ष्मण जी पवार यांनी संपूर्ण पाठिंबा देऊन या रस्त्यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष सदानंदरावजी खिंडरे धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे  यांनी  निवेदनावर प्रयत्न करून मंजुरी मिळाली आहे. सदरील रस्त्यास 425 कोटी शासनाकडून मंजूर करून घेण्यात आले आहेत या कामासाठी  वाकसे व खिंडरे यांनी मिळून या रस्त्यासाठी अतोनात प्रयत्न केले होते. वेळोवेळी शासन दरबारी लेखी  निवेदनाद्वारे पाठपुरावा करून रस्त्याला तात्काळ मंजुरी देण्यात यावी व निधी उपलब्ध करून देण्यात यावा.

या मागणीसाठी वेळी तत्कालीन राज्य बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील व बांधकाम विभागाकडे उस्मानाबाद विभागीय कार्यालयकडे केली होती. त्याचबरोबर गेवराई मतदार संघाचे विद्यमान आमदार लक्ष्मणांना पवार यांनी देखील या रस्त्यासाठी वेळोवेळी शासनाकडे आग्रह धरुन निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी केली होती.

त्याचअनुषंगाने महाराष्ट्र सरकारने राज्य रस्ता क्रमांक 232 यासाठी 425 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून हा सदरील प्रकल्प एशियाना डेव्हलपमेंट बँके (एडीबी) यांच्या मार्फत होणार असल्याचे उस्मानाबाद येथील विभागीय कार्यालयाने कळविले आहे. या राज्य रस्त्यामुळे 3 मतदारसंघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार असून उद्योग-व्यवसाlयात खूप मोठ्या प्रमाणात या रस्त्यामुळे भर पडणार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

___________