पदवीधरांची २५ वर्ष मातीत गेली --- आगळे 

औरगांबाद  कंत्राटदार असलेली व्यक्ती पदवीधर मतदार संघाची मागील दोन वेळा आमदार झाल्यामुळे व त्या अगोदर तीन वेळा भांडवलदार पक्षाची व्याक्ती आमदार झाल्यामुळे २५ वर्ष मातीत गेले असून पदवीधरांचा एकही प्रश्न मागील काळातील आमदारांनी मांडलेला नाही.

पदवीधरांची २५ वर्ष मातीत गेली --- आगळे 
25 years of graduates have passed away --- aagde

पदवीधरांची २५ वर्ष मातीत गेली --- आगळे 

औरगांबाद  कंत्राटदार असलेली व्यक्ती पदवीधर मतदार संघाची मागील दोन वेळा आमदार झाल्यामुळे व त्या अगोदर तीन वेळा भांडवलदार पक्षाची व्याक्ती आमदार झाल्यामुळे २५ वर्ष मातीत गेले असून पदवीधरांचा एकही प्रश्न मागील काळातील आमदारांनी मांडलेला नाही. त्या मुळे पदवीधरांना एक नामी संधी त्यांच्या समोर असून प्रा. नागूराव पाचांळ सर यांना प्रचंड मताधिक्याने क्रमांक १ ची पंसती  देऊन विजयी करण्याचे आवहान पदवीधर संघर्ष समीती महाराष्ट्र राज्य निमत्रंक त्तथा कामगार नेते गौतम आगळे सर यांनी येथे केले.

मराठवाडयाच्या मतावर निवडून येणारे पदवीधर मतदार संघाचे आमदार हे मराठवाडयाच्या विकासाला खीळ घालणारे असून  त्यांनी उभ्या आयुष्यात कधी पदवीधर मतदारांचे प्रश्न माडण्यांचा, सोडवण्याचा प्रयत्न केला नाही.

त्यामुळे विद्यमान आमदार - पदवीधर मतदाराच्यां समस्याचां अभ्यास न करता मागील बारा वर्षापासून सातत्याने अपयशी ठरले असून शिक्षक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, बेरोजगार पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यानां आतापर्यन्त गाजर दाखवून त्यांची ऐक पिढी बरबाद केली. चार ते पाच टर्म ऐकाही पदवीधर आमदारानी हा जिव्हाळ्याचा प्रश्न  सोडविण्यासाठी रसत्यावर उतरुन किंवा शासकीय व प्रशासकीय यत्रंणेला जाब विचारु    शकले नाहीत या महा भागानां मतदान करणार का ? असा प्रश्न उपस्थितीत पदवीधर मतदारांना करण्यात आला.

बरेच अंशकालीन कर्मचारी आजही नौकरीसाठी वाट बघत आहेत. तरी या पदवीधर आमदारानी कधीही या प्रश्नावर आक्रमक भुमीका घेतली नाही व सहानभूतीने हा प्रश्न सोडला नाही म्हणून मतदानावर बहिष्कार  घालण्या ऐवजी पदवीधरांना आपले प्रश्न सोडवायचे असतीलतर ऐक नामी संधी तुमच्या समोर असुन प्रा. नागूराव पाचांळ यांना प्रचंड मताधिक्याने क्रमांक १ ची पसंती देऊन विजयी करण्याचे आवहान जालना व औरगांबाद जिल्हयात पदवीधर मतदारांचे मेळावे संपन्न झाले त्या प्रसंगी पदवीधर संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य निमत्रंक गौतम आगळे सर यांनी केले.

मेळाव्याचे आयोजन पदवीधर संघर्ष समितीचे मराठवाडा विभागाचे संघटक आणी वंचित बहुजन आघाड़ी जालना,औरगांबाद जिल्हा कार्यकारणी ने सयुंक्त केले होते तर यथोचित मार्गदर्शन  वंचित बहुजन आघाड़ी चे मराठवाडा विभागाचे प्रशिक्षकप्रा.डॉ.सुरेष शेळके,प्रवक्ते डॉ.धर्मराज चव्हान व जालना आणी औरगांबाद जिल्हयाचे निरीक्षक डॉ.नितीन सोणवणे यानी यथोचीत मार्गदर्शन केले.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणागत

___________