नागपूर, पुणे व औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव म्हणजे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटलांचा धुव्वा..!

महाराष्ट्रातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये महा विकास आघाडी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होती या लढतीमध्ये महा विकास आघाडीने 5-1 अशा फरकाने देवेंद्र फडणवीस-चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपला मात दिली आहे.

नागपूर, पुणे व औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव म्हणजे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटलांचा धुव्वा..!
BJP's defeat in Nagpur, Pune and Aurangabad graduate constituencies is a blow to Devendra Fadnavis and Chandrakant Patil ..!

नागपूर, पुणे व औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव म्हणजे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटलांचा धुव्वा..!

पुणे - महाराष्ट्रातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये महा विकास आघाडी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होती या लढतीमध्ये महा विकास आघाडीने 5-1 अशा फरकाने देवेंद्र फडणवीस-चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपला मात दिली आहे.
महाराष्ट्रातील निवडणूक खऱ्या अर्थाने एक लिटमस टेस्ट होती.

कारण विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेली महाविकासआघाडी ही जनतेचा विश्वास घात करून सत्तेवर आली आहे अशा प्रकारची वल्गना वारंवार भाजप नेते करत होते. नुकतेच या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहेत, त्याच वेळी ही निवडणूक महाराष्ट्राच्या सहा विधानपरिषद मतदारसंघांमध्ये लढवली गेली.

महा विकास आघाडी ने 5-1 या फरकाने निवडणूक जिंकून जनता आमच्यासोबत आहे हे दाखवून दिले आहे. या सर्व जागांमध्ये देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील या जोडीचा जनतेने चांगला समाचार घेतलेला दिसतो.
नागपूर व पुणे पदवीधर मतदारसंघ हे दोन भाजपचे बालेकिल्ले मानला जात होते.

नागपूर पदवीधर मतदार संघ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला त्यातही देवेंद्र फडणवीस यांचा तो गड मानला जात होता कारण या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांचे वडील बरेच वर्ष आमदार होते त्यानंतर नितीन गडकरी यांनी इथूनच आपली राजकीय कारकीर्द सुरू करून राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत मजल मारली गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यावेळी ते नागपूर पदवीधर चे आमदार होते. मागील वेळी आमदार असलेले अनिल सोले हे गडकरी यांच्या जवळचे असल्याने त्यांचा पत्ता यावेळी कट करण्यात आला. याच प्रकारे विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना गडकरी गटातील असल्याने उमेदवारी नाकारली होती.

यासोबत भाजपचे उमेदवार असलेले संदीप जोशी यांनी एक प्रामाणिक अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या अंगावर  महिला पाठवणे, चारित्र्य हननाचा प्रयत्न करणे हे सुद्धा सुशिक्षित नागपूरकरांना आवडलेले नव्हते. दुसरीकडे नागपुर ची लढाई ब्राह्मण विरुद्ध ओबीसी अशा स्वरूपाची झाल्याने राज्यातील भाजपपासून दूर चाललेला ओबीसी समाज सहाजिकच त्यांच्या विरोधात मतपेटीच्या रूपात प्रकट झाला.नागपुर मधील पराभव हा देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीचा पराभव आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आमदार होते. यापूर्वीही केंद्रीय मंत्री जावडेकर पुणे पदवीधर मधून निवडून आलेले होते त्यामुळे हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता यामध्ये पुणे पदवीधर ची निवडणूक वनवे होईल अशा प्रकारचा अंधविश्वास चंद्रकांत पाटील यांना होता मात्र जनतेने त्यांना साफ नाकारले पुणे पदवीधर मधील पराभव चंद्रकांत पाटलांचा वैयक्तिक पराभव आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात सर्वात मोठा वाटा देवेंद्र फडणवीस यांचा होता. वास्तविक पाहता भाजपचे प्रवीण घुगे यांनी या मतदारसंघात मागील वर्षभरापासून संपर्क अभियान घेऊन तयारी केली होती. मात्र ते पंकजा मुंडे यांच्या जवळचे असल्याने त्यांना डावलण्यात आले. प्रवीण घुगे यांच्यासाठी रावसाहेब दानवे सुद्धा आग्रही होते. मात्र पंकजा व दानवे या दोघांनाही ठेंगा दाखवत स्वतःचे समर्थक असणारे शिरीष बोराळकर यांची उमेदवारी लादून एक प्रकारे फडणवीस यांनी भाजपचा पराभव ओढवून घेतला.

त्यामुळे औरंगाबाद मधील पराभव हा पंकजा-दानवे यांचा पराभव नसून तो देवेंद्र फडणवीस यांचा पराभव मानला पाहिजे. कारण या निवडणुकीचे प्रचार प्रमुखपद सुद्धा फडणवीस यांनी आपल्या विश्वासातील निलंगेकर यांना जाणीवपूर्वक देऊन बोराळकर यांना निवडून आणण्यासाठी जंग जंग पछाडले होते.मात्र बोराळकर यांची निवडून येण्याची कुवत नव्हती हे सर्वांना ठाऊक होते. प्रवीण घुगे यांना उमेदवारी मिळाली असती तर याठिकाणी वेगळे चित्र दिसले असते. मात्र त्यामुळे पंकजा समर्थक आमदार झाले असते म्हणून भाजपने हा पराभव स्वतः ओढवून घेतला.

एकूणच काय तर पदवीधर मतदारसंघातील हे सर्व निकाल पाहिजे असता देवेंद्र फडणवीस  व चंद्रकांत पाटील या जोडीला  महाराष्ट्रातील उच्चशिक्षित पदवीधरांनी नाकारले आहे. मी पुन्हा येईल या पद्धतीचा फाजील आत्मविश्वास अद्यापही या जोडीच्या डोक्यात आहे. म्हणूनच त्यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षाचे ब्रीदवाक्य समजले जाणारे 'प्रथम राष्ट्र नंतर पक्ष व नंतर व्यक्ती' या त्यांच्या पक्षांचा धोरणाला हरताळ फासत प्रथम व्यक्ती व त्याच्या जवळचे लोक नंतर पक्ष या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रात काम केले आहे त्यामुळे जे लोक त्यांना अडचणीचे वाटतात 'त्यांच्या विरोधकांना बळ देणे', 'त्यांच्या समर्थकांना तिकीट नाकारणे' अशा प्रकारचे उद्योग देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटलांच्या मदतीने मागील पाच वर्ष करत आहेत.

यातून त्यांचा एकच हेतू दिसतो त्यांना 'शत:प्रतिशत भाजप' यापेक्षा 'शत:प्रतिशत फडणवीस टोळी' अशा प्रकारची भाजपा हवी आहे. मात्र जनता सुज्ञ आहे त्यांना काय बरोबर काय चुकीचे हे चांगली समजते. त्यामुळे त्यांनी या टोळीला नाकारले आहे. हेच या निवडणुकीच्या विश्लेषण वरून लक्षात येते.

जामखेड

प्रतिनिधी - प्रभाकर तिडके
___________