जिओमध्ये गुगल करणार ३३ हजार ७३७ कोटींची गुंतवणूक, मुकेश अंबानींनी दिली माहिती.....

मुकेश अंबानीं यांनी दिली माहिती, जिओमध्ये गुगलनी ३३ हजार ७३७ कोटींची गुंतवणूक केली.

जिओमध्ये गुगल करणार ३३ हजार ७३७ कोटींची गुंतवणूक, मुकेश अंबानींनी दिली माहिती.....

जिओमध्ये गुगल करणार ३३ हजार ७३७ कोटींची गुंतवणूक, मुकेश अंबानींनी दिली माहिती.....

रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा २०२० : मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड RIL कंपनीची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा यावर्षी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. या सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये आघाडीची टेक कंपनी गुगल मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. तसेच, गुगलसोबतच्या भागीदारीद्वारे भारताला 2G मुक्त करु, असेही अंबानी यावेळी म्हणाले.

जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुगल ३३ हजार ७३७ कोटी रुपये गुंतवणार असल्याची माहिती यावेळी अंबानी यांनी दिली आहे. या गुंतवणूकीद्वारे गुगल कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये ७.७ टक्क्यांची हिस्सेदारी घेईल. या गुंतवणूकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये लॉकडाउनदरम्यान गेल्या तीन महिन्यांत झालेल्या एकूण गुंतवणूकीचा आकडा १ लाख ५२ हजार ०५७ कोटी रुपये होईल.