काळेवाडीत कच-याच्या ढिगा-यात सापडले मुलीचे अर्भक...

काळेवाडीतील राजवाडेनगर, तापकीर मळा चौक येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दोन तासांपूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळले. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

काळेवाडीत कच-याच्या ढिगा-यात सापडले मुलीचे अर्भक...
Girl's baby found in rubbish heap in Kalewadi ...

काळेवाडीत कच-याच्या ढिगा-यात सापडले मुलीचे अर्भक...

पुणे पिंपरी – काळेवाडीतील राजवाडेनगर, तापकीर मळा चौक येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दोन तासांपूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळले. ही घटना बुधवारी (दि. २८) सकाळी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी नितीन सुर्यवंशी यांना बुधवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कचऱ्याच्या ढिगामध्ये स्त्री जातीचे जीवंत अर्भक आढळून आले.

काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नढे, इरफान शेख, रोहित कदम आरोग्य निरीक्षक वाटाडे यांनी त्यास पिंपरीतील जिजामाता रूग्णालयात दाखल केले. त्या अर्भकाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून अर्भकाच्या माता-पित्यांचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.

पिंपरी , पुणे

प्रतिनिधी - आत्माराम काळे

_________