आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गटविकास अधिकारी यांना वांगण सुळे ग्रामस्थ यांच्याकडून निवेदन...| १४ वा वित्त आयोग व पेसा अंतर्गत येणारा निधी नियोजनात लोकसंख्येच्या प्रमाणात अल्प खर्च अन्याय केल्याबाबत...

सुरगाना तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भवाडा अंतर्गत मौजे वांगण सुळे हे सर्वात मोठ्या लोकसंख्येचे गाव असून सरपंच व ग्रामसेवक हे मनमानी करून आमच्या गावावर  अति अन्याय केला आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गटविकास अधिकारी यांना वांगण सुळे ग्रामस्थ यांच्याकडून निवेदन...

१४ वा वित्त आयोग व पेसा अंतर्गत येणारा निधी नियोजनात लोकसंख्येच्या प्रमाणात अल्प खर्च अन्याय केल्याबाबत...

सुरगाना तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भवाडा अंतर्गत मौजे वांगण सुळे हे सर्वात मोठ्या लोकसंख्येचे गाव असून सरपंच व ग्रामसेवक हे मनमानी करून आमच्या गावावर  अति अन्याय केला आहे. ग्रामपंचायत मध्ये पेसा अंतर्गत येणारा निधी हा लोकसंख्येच्या प्रमाणात वाटप केला गेला पाहिजे होता परंतु गेली चार वर्षात सदर ग्रामपंचायतीने आमच्या गावावर खूप मोठा अन्याय केला आहे.
    सदर बाबतीत सरपंच व ग्रामसेवक यांनी विचारणी केली असता उडवा उडवीचे उत्तरे देऊन दि - २४ नोव्हेंबर २०२० रोजी वांगण सुळे येथे येतो व तुमचा गावाचा पूर्ण हिशोब देतो असे म्हणून आम्ही ग्रामसेवक, सरपंच यांची संध्याकाळ पर्यंत वाट बघितली परंतु ते आले नाहीत म्हणून यात काहीतरी घोटाळा आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे,आज रोजी सर्व ग्रामस्थ मिळून गटविकास अधिकारी आपल्याकडे न्याय मागत आहोत.

सदरच्या बाबतीत जो पर्येंत आम्हाला अचूक अशी माहिती मिळत नाही तो पर्येंत ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयास आम्ही ग्रामस्थ कुलूप लावू ग्रामपंचायतीचे कामकाज बंद पाडू व आमच्यावर झालेला अन्याय हा पक्षपाती स्वरूपाचा असून गेली साडेचार वर्षात सरपंच व ग्रामसेवक यांनी मोठया प्रमाणात घोटाळा केला असावा असे आम्हाला वाटते ग्रामपंचायतीला आलेला सर्व निधी व झालेला सर्व खर्च याचा हिशोब मिळत नाही तो पर्यंत ग्रामस्थ वांगण हे ग्रामपंचायतीला कुलूप लावू व ग्रामपंचायतीचे कामकाज बंद पाडू असे निवेदनात म्हटले आहे.

सदरील निवेदन प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प नाशिक,मा.तहसीलदार तहसील कार्यालय सुरगाणा व मा.पोलिस निरीक्षक सुरगाणा यांना देण्यात आली आहे.

यावेळी उपस्थित ग्रामस्थ शिवराम टोपले,कैलास धूम,नामदेव लोखंडे, विजय राऊत,प्रलाद चौधरी, विनायक जाधव,प्रदीप टोपले,प्रवीण टोपले,निलेश टोपले,मधुकर म्हसे,रसिक टोपले,राजाराम चव्हाण आदी होते.

ता . सुरगाना

प्रतिनिधी - अशोक भोये

___________