वन विभागाच्या कारवाईत पोपट, कासव जप्त ; नागरिकांना वनविभागाकडून समज...
कासव व पोपट पाळणे कायद्याने गुन्हा आहे परंतू नागरिक स्वतःच्या किंवा मुलाच्या हौशेखातर अवैधरित्या हे वन्यजीव विकत घेताना आढळून येते आहेत. तसेच अंधश्रद्धेच्या नावाखाली कासव विकत, पाळताना आढळून येतात याबाबत वनविभागाने आता कठोर पावले उचलली आहेत.

वन विभागाच्या कारवाईत पोपट, कासव जप्त ; नागरिकांना वनविभागाकडून समज...
कल्याण : कासव व पोपट पाळणे कायद्याने गुन्हा आहे परंतू नागरिक स्वतःच्या किंवा मुलाच्या हौशेखातर अवैधरित्या हे वन्यजीव विकत घेताना आढळून येते आहेत. तसेच अंधश्रद्धेच्या नावाखाली कासव विकत, पाळताना आढळून येतात याबाबत वनविभागाने आता कठोर पावले उचलली आहेत. विकणारे दुकानदार आणि विकत घेणारे नागरिक या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची आदेश वरिष्ठ पातळीवर घेतला आहे.
कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी खबरीकडून मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे अनेक दुकानात धाडी टाकल्या व वन्यजीव (कासव/पोपट) हस्तगत करून कारवाई केली. तसेच वॉर रेस्क्यू फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी कल्याण, डोंबिवली व टिटवाळा परिसरात कल्याण वनविभागांच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक ठिकाणी घरोघरी जाऊन शोध मोहीम घेतली.
यामध्ये लोकांनी आपल्या घरी वन्यजीव पाळले असल्याचे आढळून आले यामध्ये प्रामुख्याने ३ पहाडी पोपट, ७ कंठवाला पोपट, १ ठिपकेवाला होला, १ घार, १ मृदूपाठीचे कासव जप्त केले. तर २ घोणस, २ धामण, १ रुखइ साप देखील पकडले आहेत. या वन्यजीवांची पशुवैदयकीय अधिकारी डॉ. रायबोले यांनी प्राथमीक तपासणी केली. यामध्ये अनेक पक्षांचे पंख छाटल्याचे आढळून आले. औषधोपचार करून काही दिवस तज्ञाच्या देखरेख करीता सांगितले. कल्याण वनविभागांच्या परवानगीने वॉर रेस्क्यू टिमचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी काही दिवस वन्यजीवांची देखभाल केली व पंख आल्यावर या सर्व वन्यजीवांना वनविभागच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष निर्सगमुक्त केले.
यावेळी वनविभागांच्या वतीने वनपाल मच्छिद्र जाधव, वनरक्षक रोहित भोई, तसेच वॉर रेस्क्यू फाउंडेशनचे प्रेम आहेर, चंदन ठाकुर, रेहान मोतिवाला, पार्थ पाठारे, फाल्गुनी दलाल हे उपस्थित होते. आपल्या शेजारी पोपट पाळल्याचे निर्दशनात असल्यास किंवा वन्यजीवाबाबत तक्रार असल्यास हॅलो फोरेस्ट १९२६ या टोल फ्री नंबर संपर्क साधावा. किंवा साप आढळून आल्यास वॉर रेस्क्यू टिम च्या 9869343535/ 9768944939/ 8850585854 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
___________