अखेरीस ती वेळ आलिच...| लोककलावंत विशाखा काळे काळाच्या पडद्याआड...| कलावंतांच्या आक्रोशाच्या लढा तीव्र करणार - बाळासाहेब रास्ते...

आम्ही गेली चार महिन्या पासून बळीराजा पार्टी महाराष्ट्र व ल़ोककला न्युज चा वतीने महाराष्ट्रातील लोककलावंत यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे.हे सातत्याने मांडत आहोत.परंतु येथिल उध्दव ठाकरे यांच्या सरकारने याबाबत पुर्णपणे दुर्लक्ष केले.

अखेरीस ती वेळ आलिच...| लोककलावंत विशाखा काळे काळाच्या पडद्याआड...| कलावंतांच्या आक्रोशाच्या लढा तीव्र करणार - बाळासाहेब रास्ते...
Folk artist Visakha behind the curtain of black time ... | Will intensify the fight against the wrath of artists - Balasaheb Raste ...

अखेरीस ती वेळ आलिच...

 लोककलावंत विशाखा काळे काळाच्या पडद्याआड

कलावंतांच्या आक्रोशाच्या लढा तीव्र करणार - बाळासाहेब रास्ते

आम्ही गेली चार महिन्या पासून बळीराजा पार्टी महाराष्ट्र व ल़ोककला न्युज चा वतीने महाराष्ट्रातील लोककलावंत यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे.हे सातत्याने मांडत आहोत.परंतु येथिल उध्दव ठाकरे यांच्या सरकारने याबाबत पुर्णपणे दुर्लक्ष केले.ऐवढेच नसुन दि.१८जुलै२०२०रोजी बळीराजा पार्टी महाराष्ट्राच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त काढलेल्या मोर्चा चे निवेदन ही उपस्थित असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांनी यांनी स्विकारण्यास नकार दिला.जिल्हयातुन आलेल्या लोककलावंतांनी याचा जाहीर निषेध व्यक्त केला व निघुन गेले.

कालांतरानेआम्ही बळीराजा पार्टी महाराष्ट्राच्या वतीने व लोककला न्युज चा वतीने लोककलावंता चा आक्रोश मांडत राहिलो परंतु शेवटी आमची भगणी नृत्यांगना विशाखा काळे हिने दिनांक ६/ १०/ २०२० रोजी. दुपारी राहत्या घरी परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली.कोरोना च्या महामारी ने गेली सहा महिने कुठलेच काम नसल्याने आणि घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने विशाखा काळे हिने आपला जीवन प्रवास संपवला.

हि घटना केवळ शासनाचा नाकर्तेपणा मुळे घडली आहे.या दरम्यान चा काळात लोककलावंत यांच्या समस्या घेऊन अनेकांनी मंत्र्यांचे हुंबरठे झिजवले पण कोणी च लक्ष दिले नाही.लोककलावंता वर आत्महात्या करण्याची वेळ आणणार्या शासनाचा धिकार करतो.व लोककलावंत यांचा आक्रोश पुन्हा एकदा शासनाचा पर्यंत पोहवण्याचा लढा तिव्र करत आहोत....

बाळासाहेब रास्ते,
महासचिव बळीराजा पार्टी महाराष्ट्र

सांगली जिल्हा

प्रतिनिधी : जगन्नाथ सकट

___________