आसाममध्ये पूरस्थिती गंभीर , ५९ जणांचा मुत्यु.....

आसाममध्ये दिनांक १४ मंगळवारी पूर आल्यामुळे गंभीर अवस्था..

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर , ५९ जणांचा मुत्यु.....

आसाम मध्ये ५९ जणांचा मुत्यु , पूरस्थिती गंभीर……

आसाममध्ये मंगळवार दि. १४ रोजी पुरामुळे पाच जिल्ह्यांमध्ये जवळपास ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ५९ झाली आहे. राज्यात ३३ पैकी २८ जिल्हे पूरग्रस्त आहेत आणि ३३ लाख लोक पूरबाधित आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, मागील चार आठवड्यांमध्ये विश्वनाथ, तिनसुकिया, लखीमपुर, बनगाइगाव, कामरूप, गोलाघाट, शिवसागर, मोरीगांव, धुबरु, नगांव, नलबारी, बारपेटा, धेमाजी, उदलगुडी, गोलपारा और डिब्रूगढ जिल्ह्यांमध्ये पुरामुळे ५९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
२२ मेपासून आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भूस्खलनात २६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, धुबरी आणि मोरीगावमध्ये दोन लोकांचा बुडून मृत्यू झाला होता. परंतु, या घटनेचा पुराशी काही संबंध नाही. आसाममधील १२ जिल्ह्यांमध्ये ब्रह्मपुत्रा नदीसह ८ उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. बारपेटा जिल्हा सर्वाधिक पूरबाधित आहे.