चिंचवड मधील पोदार स्कूलमध्ये लॉकडाऊननंतर प्रथमच वाजली शाळेची पहिली घंटा…| शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळेत सोशल डिस्टंसिंगचे पालन – प्राचार्य शहनाज कोटार...
कोरोनाच्या प्रादुर्भाव ओसरल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चिंचवड मधील पोदार इंटरनॅशनल स्कूल ही शाळा दि.७ जानेवारी (गुरवार) सुरु करण्यात आली आहे.
चिंचवड मधील पोदार स्कूलमध्ये लॉकडाऊननंतर प्रथमच वाजली शाळेची पहिली घंटा…
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळेत सोशल डिस्टंसिंगचे पालन – प्राचार्य शहनाज कोटार...
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२१) :- कोरोनाच्या प्रादुर्भाव ओसरल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चिंचवड मधील पोदार इंटरनॅशनल स्कूल ही शाळा दि.७ जानेवारी (गुरवार) सुरु करण्यात आली आहे.
शाळेच्या प्राचार्य शहनाज कोटार म्हणाल्या, की शाळेत सर्व मुलांचे स्वागत करण्यात आले. मुलांना, शिक्षकांना, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शाळेत सॅनिटाईजर, मास्क व आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सरकारी नियमानुसार सर्व खबरदारी व उपाययोजनाची पुर्तता केलेली आहे. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोरोना चाचणी (RT-PCR) करण्यात आलेली आहे. प्रत्येक विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या शरीराचे तापमान थर्मल स्क्रिनिंग मशीनद्वारे व पल्स ऑक्सी मिटर ने चेक करण्यात आले. तसेच सर्व वर्गखोल्या, ऑफिस व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून प्रत्येक वर्गात १२ विद्यार्थी बसविण्यात आले आहेत असे ऐकून ९४ विदयार्थी पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित होते.
शाळेच्या प्राचार्य शहनाज कोटार म्हणाल्या, विदयार्थी“घरात ८-९ महिन्यापासून बसून असल्यामुळे शाळेत येण्यासाठी मुलांची उत्सुकता वाढली होती. सगळे मित्र ,शिक्षक खूप दिवसांनी कधी भेटतील असे मुलांना झाले होते. लॉक डाऊन मध्ये ही मुलांना चांगल्या प्रकारे ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. आता शाळेत आल्यानंतर चांगले दर्जेचे शिक्षण मुलांना आता मिळणार आहे. पालकांनी मुलांना शाळेत पाठवताना कोणतीही खंत बाळगू नये. शाळेलाही मुलांची काळजी आहे. सर्व स्टाफ च्या वतीने मुलाची काळजी घेण्यात आली” व तसेच शाळा परत सुरू झाल्या मुळे येत्या मे महिन्यात १० वी व १२ वी ची वार्षिक बोर्ड परीक्षा असल्यामुळे मुलांची वार्षिक परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करून घेता येईल.
पुणे
प्रतिनिधी - आत्माराम काळे
___________